Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरवे-लाल की काळे? तुम्ही कोणत्या रंगाचे द्राक्ष खातात? आरोग्यासाठी कोणते सर्वाधिक फायदेशीर?

उन्हाळ्यात द्राक्षांचे सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. तुम्ही द्राक्षांचं सेवन केल्यास अनेक आजारांपासून स्वतःचं रक्षण करू शकता. बऱ्याचदा लोकांच्या मनात असा प्रश्न असतो की कोणत्या रंगाची द्राक्षं जास्त फायदेशीर असतात. चला जाणून घेऊया कोणत्या रंगाचे द्राक्षे खायला हवेत?

हिरवे-लाल की काळे? तुम्ही कोणत्या रंगाचे द्राक्ष खातात? आरोग्यासाठी कोणते सर्वाधिक फायदेशीर?
graps
Follow us
| Updated on: Mar 31, 2025 | 5:50 PM

जसा उन्हाळा सुरू झाला की बरेच जण द्राक्षं खातात. द्राक्षं हे सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे. द्राक्षं दिसायला जरी लहान असले तरी त्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. तुम्ही लाल, काळ्या किंवा हिरव्या रंगाचे द्राक्षं पाहिले असतील आणि तुम्ही सर्व खाल्लीही असतील. प्रत्येक जातीच्या आणि रंगाच्या द्राक्षांमध्ये वेगवेगळे पोषक घटक आढळतात. आजकाल बाजारातही द्राक्षे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. पण या तीन रंगाच्या द्राक्षांपैकी कोणते द्राक्ष आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर ठरू शकते. हे जाणून घेऊया…

लाल द्राक्षांचे फायदे काय?

  • तुम्हाला वजन कमी करण्याचे असेल तर तुमच्यासाठी लाल द्राक्षे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. लाल रंगाच्या द्राक्षांमध्ये फायबर असल्याने लवकर भूक लागत नाही.
  • लाल द्राक्षं आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित करण्यासह शरीरासाठी अनावश्यक असलेल्या कोलेस्ट्रॉलला कमी करण्यास मदत करते.
  • लाल द्राक्ष खाल्याने रक्तवाहिन्यांची प्रक्रिया उत्तमरित्या चालते.
  • लाल द्राक्षांमध्ये कार्बोहायड्रेट्स असले तरी, ते रक्तातील साखर वाढवण्याऐवजी कमी करण्यास मदत करतात.
  • लाल द्राक्षे खाल्याने व्हिटॅमिन सी शरिरास मिळते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासही फायदेशीर ठरते.
  • लाल द्राक्षांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी वरदान असून हे फक्त सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करत नाहीत तर तुम्हाला कायम तरूण ठेवण्यात मदत करते
  • लाल द्राक्षांमध्ये असलेले काही घटक हे डोळ्याची दृष्टी सुधारण्यास आणि मोतीबिंदूसारख्या समस्या टाळण्यास मदत करतात.

हिरव्या रंगाचे द्राक्ष खाल्यास काय होते?

  • हिरव्या रंगाच्या द्राक्षांमध्ये सर्वाधिक फायबर असते, जे पचनसंस्था सुधारण्यासह मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
  • हिरव्या रंगाचे द्राक्ष कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते. यासह रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते.
  • हिरव्या द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने जे त्वचेला चिरतरूण आणि तेजस्वी ठेवण्यास फायदेशीर ठरतात.
  • हिरव्या द्राक्षांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. त्यामुळे मधुमेह झालेल्यांसाठी हे द्राक्ष थोडे उत्तम पर्याय आहे
  • हिरव्या द्राक्षांमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

काळ्या रंगाचे द्राक्ष किती फायदेशीर?

  • काळ्या रंगाच्या द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा तरुण राहते.
  • काळे द्राक्ष स्मरणशक्ती वाढवण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.
  • काळ्या द्राक्षांमध्ये असलेले पॉलीफेनॉल शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात.
  • काळ्या रंगाच्या द्राक्षांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण सर्वाधिक असल्याने हाडे बळकट आणि मजबूत होण्यास मदत होते.

कोणती द्राक्षे जास्त फायदेशीर?

आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काळी द्राक्षे सर्वात फायदेशीर मानली जातात. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स आणि हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर घटक असतात. तर हिरव्या आणि लाल रंगाच्या द्राक्षांचेही ठराविक असे काही फायदे आहेत आणि ते आहारात समाविष्ट केले पाहिजे जे आपल्या शरिरासाठी फायदेशीर ठरू शकतात.

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.