अरे ही तर स्कॉटलॅंडची आळंदी; इथे जोडपी पळून येऊन लग्न करतात, दरवर्षी 6000 लग्न लागतात

स्कॉटलँडच्या ग्रेटना ग्रीन या छोट्याशा गावाची ओळख "लग्नाची राजधानी" म्हणून आहे. १८ व्या शतकापासून इंग्लंडमधील जोडपी इथे पळून येऊन लग्न करायची.आजही हजारो लग्नं येथे होतात. ग्रेटना ग्रीन म्हणजे जोडप्यांसाठी आळंदीच आहे.

अरे ही तर स्कॉटलॅंडची आळंदी; इथे जोडपी पळून येऊन लग्न करतात, दरवर्षी 6000 लग्न लागतात
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 3:19 PM

आळंदी म्हटलं की ज्ञानेश्वर माऊलींची आठवण येते. कित्येक भाविक ये रोज आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी येतच असतात. पण आळंदी म्हटलं की अजून एक गोष्ट डोक्यात येते ती म्हणजे लग्न. ज्यांना लग्नासाठी काही अडचणी असतात किंवा ज्यांना कोणालाही न सांगता लग्न करायचे असते तेव्हा जोडपी शक्यतो आळंदीला येऊनच लग्न केलेलं आपण ऐकलं असेल. हे फक्त आपल्या देशातच घडतं असं नाही तर अशीच एक आळंदी फऑरेनमध्येही आहे बरं का

ही फॉरेनची आळंदी आहे स्कॉटलँडमध्ये. स्कॉटलँडच्या सीमेवरचं छोटंसं असणारं टुमदार गाव ग्रेटना ग्रीन म्हणजे तिथली आळंदी आहे. तब्बल अडीचशे वर्षं इथे जोडपी पळून यायची आणि लग्न करायची. ग्रेटना ग्रीन अठराव्या शतकापासून लग्नाची राजधानी आहे असं म्हटंल जातं. या गावाची लोकसंख्या साधारण 3000 च्या आसपास आहे, पण लोकसंख्येच्या दुप्पट तर इथे फक्त लग्न होतात. दरवर्षी ग्रेटना ग्रीनमध्ये जवळपास 6000 लग्नं लागतात.

एवढच नाही तर एका रिपोर्टनुसार ही जागा इतकी फेमस आहे की इथे लग्नासाठी तब्बल दीड वर्षांचं वेटिंग असायचं. म्हणजे ज्या दिवशी नाव नोंदवू तर त्याच्या दीड वर्षांनी वैगरे त्या जोडप्याला लग्नाची तारीख मिळायची.

प्रेमिकांचं प्रतीक असलेला ग्रेटना ग्रीनमधल्या 'लव्हर्स' चा पुतळा

प्रेमिकांचं प्रतीक असलेला ग्रेटना ग्रीनमधल्या ‘लव्हर्स’ चा पुतळा

पण इथे जोडपी पळून का यायची?

1754 ची लॉर्ड हेड्रिंक याने इंग्लंडमध्ये नवा कायदा पारित केला होता की, 21 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलामुलींना लग्नासाठी त्यांच्या पालकांची परवानगी अनिर्वाय होती.

जर पालकांची परवानगी दिलीच तरीही 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या जोडप्यांना लग्नही खाजगी नाही तर, सार्वजनिक चर्चमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणं आवश्यक असायचं, तसेच त्या लग्नाची रीतसर नोंदणी करणं आवश्यक असायचं

जर कोणत्याही धर्मगुरूने खाजगी जागेत कोणाचं लग्न लावलं तर त्या धर्मगुरूला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होत असे. त्यामुळे इंग्लंडमध्ये एक प्रकारची भिती पसरली होती आणि घरच्यांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह करू पाहाणाऱ्यांची मात्र पंचाईत झाली होती.

इंग्लंडमधील कायद्यामुळे स्कॉटलॅंडच्या आळंदीचा जन्म

इंग्लंडने जरी लग्नाचे कायदे कडक केले होते तरी स्कॉटलॅंडमध्ये मात्र 12 वर्षांच्या वरच्या मुली आणि 14 वर्षं वयावरील मुलं स्वतःच्या मर्जीने लग्न करू शकत होते. त्यांना कोणाच्या परवानगीची गरज नव्हती.

स्कॉटलॅंडमध्ये मॅरेज बाय डिक्लेरेशनची पद्धत होती. म्हणजेच दोन साक्षीदारांच्या समोर आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे असं दोघांनी घोषित केलं की लग्न झालं असं मानलं जायचं.

स्कॉटलॅंडमध्ये लग्न चर्चमध्येच झालं पाहिजे असा काही नियम नव्हता. तुम्ही स्कॉटलॅंडच्या भूमीवर कुठेही लग्न करू शकत होता, आणि देवाचं नाव घेऊन कोणीही तुमचं लग्न लावूही शकत होतं. ग्रेटना ग्रीन स्कॉटलॅंडमध्ये असलं तरी ते अगदीच इंग्लंडच्या सीमेवर आहे.

इंग्लंडमधून जोडपी लग्नासाठी इथे पळून यायची

त्यामुळे इंग्लंडमधून जोडपी लग्नासाठी इथे पळून यायला लागली. पण लग्न लावायला इथे कोणी धर्मगुरू नव्हते. त्यावेळी ग्रेटनातले बहुसंख्य लोक लोहारकाम करायचे. मग तेच लोक ‘ऐरण धर्मगुरू’ झाले. हे‘ऐरण धर्मगुरू’ फार पैसेही घ्यायचे नाहीत.

एकदा लग्न झालं की ते स्कॉटलॅंडच्या नियमाप्रमाणे वैध होतं. मग ही तरुण जोडपी तिथेच काही दिवस राहून आपलं लग्न ‘साजरं’ करायची. नियमाप्रमाणे एकदा पतीपत्नींमध्ये संबंध झाले की त्यांचं लग्न रद्द करता येत नव्हतं असा नियम होता.

1843 साली लोहारकाम करणाऱ्या एका धर्मगुरूने तेव्हाच्या एका वर्तमानपत्रात दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की 25 वर्षांत त्याने जवळपास 3500 लग्न लावली होती. ग्रेटना ग्रीनचे उल्लेख साहित्यातही आढळतात.

लग्नासाठी स्कॉटलॅंडमध्येही नवा नियम काढण्यात आला 

पण हे जेव्हा इंग्लंडचे नेते आणि धर्मगुरूंना समजल्यावर ते संतापले. स्कॉटलॅंडमध्ये अशा पळून जाणाऱ्यांची लग्न बंद व्हावीत म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न झाले. कारण अशा लग्नांमुळे इंग्लंडची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना त्यांची झाली होती.

या वादानंतर काही वर्षांनी तिथे एक कायदा पारित करण्यात आला की ज्या जोडप्याला स्कॉटलॅंडमध्ये पळून जाऊन लग्न करायचं असेल काही काळ स्कॉटलॅंडमध्ये लग्न न करता आणि एकमेकांशी संबंध न ठेवता राहावं लागेल. याला ‘कुलिंग ऑफ पीरियड’ असं नाव दिलं गेलं.

हा काळ 21 दिवसांचा होता आणि या काळात कमीत कमी एकाला तरी तेवढा काळ इथल्या एखाद्या चर्चच्या आवारात राहाणं बंधनकारक होतं. भावनेच्या भरात किशोरवयीन मुलांनी लग्नाचा निर्णय घेऊ नये म्हणून हा कायदा करण्यात आला होता.

जसा काळ बदलला तसं ग्रेटनाचं रुपही बदललं.

1940 साली स्कॉटलॅंडमध्ये ‘मॅरेज बाय डिक्लेरेशन’ बेकायदेशीर ठरवण्यात आला. म्हणजे आता फक्त आम्हाला लग्न करायचं आहे असं म्हणून चालणार नव्हतं. त्या लग्नाची आधी रीतसर नोटीस द्यावी लागणार होती आणि नंतर त्याची नोंदणीही करावी लागणार होती.

त्यानंतर 1977 मध्ये इंग्लंडमधलाही कायदा बदलला. 18 वर्षं पूर्ण केलेल्या मुलांना पालकांच्या संमतीशिवाय लग्न करता येणार होतं. त्यामुळे हा त्रास नंतर फार जोडप्यांना भोगावा लागला नाही.

लग्नाआधी 15 दिवसांची नोटीस द्यावी लागते

दरम्यान आता मात्र इथे असं पळून येऊन लग्न करणारे फारसे दिसत नसले तरी ही जागा प्रेमिकांसाठीच म्हणूनच फेमस आहे. इथे आजही हजारो जोडपी लग्न करण्यासाठी येतात पण कोणत्याही अडचणीशिवाय. त्यावरच इथल्या स्थानिकांची कमाई होते.

स्कॉटलॅंडमध्ये लग्नाआधी 15 दिवसांची नोटीस द्यावी लागते पण लग्न करण्यासाठी तिथेले रहिवासी असण्याची किंवा तिथे काही काळ वास्तव्य करण्याची अट काढून टाकण्यात आली आहे.

अवघ्या 15 मिनिटांत लग्न लावले जाते

बरं ग्रेटना ग्रीनमध्ये एका दिवसात जवळपास 10-10 लग्न लावली जातात. अनेकदा तर 15 मिनिटांमध्ये लग्न उरकली जातात. मात्र आजही इंग्लंड आणि स्कॉटलॅंडच्या लग्नाच्या कायद्यात थोडीशी फट आहेच.

इंग्लंडमध्ये पालकांच्या संमतीशिवाय लग्न करण्याचं वय 18 आहे तरस्कॉटलॅंडमध्ये 16 आहे. तर ही सर्व कहाणी ऐकून खरच वाटतं की नाही ही लग्नासाठी तरी स्कॉटलॅंडमधलं ग्रेटना ग्रीन ही जोडप्यांसाठी आळंदीच आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.