Health Tips | पेरूच्या पानांचा आरोग्यवर्धक ‘हर्बल चहा’, नियमित सेवनाने होतील अनेक फायदे!
पेरूच्या पानात अँटिऑक्सिडेंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि क्युरेसेटिकसह अनेक औषधी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात.
मुंबई : हिवाळ्याच्या काळात बाजारात पेरू हे फळ मोठ्या प्रमाणात विक्रीस येते. हिवाळ्यात याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याच्या चवीबद्दल देखील खूप चर्चा आहे. पेरूमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण केवळ पेरूच नव्हे, तर त्याची पानेही आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का?(Guava leaf herbal tea for good health)
या पानांमध्ये पुष्कळ पोषकद्रव्ये आढळतात, त्यामुळे ही पाने फळापेक्षा जास्त फायदेशीर असतात. औषधी गुणधर्मांमुळे, अनेक ठिकाणी पेरूच्या पानांचा चहा नियमित सेवन केला जातो. पेरूच्या पानांपासून बनवलेल्या चहाला ‘हर्बल टी’ म्हणून ओळखले जाते. त्याचे औषधी गुणधर्म देखील अनेक आहेत.
पेरूच्या पानात अँटिऑक्सिडेंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि क्युरेसेटिकसह अनेक औषधी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. यापासून होणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेतल्यास तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. चला तर, याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया…
पेरूच्या पानाचा चहा कसा बनवायचा?
हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम पेरूची पाने स्वच्छ धुवून घ्यावी लागतील. याशिवाय एक तृतीय चमचा सामान्य चहाची पावडर, दीड कप पाणी आणि मध हे साहित्य लागेल.
कृती- प्रथम पेरूची 10 पाने चांगली धुवा. ही पाने एक भांड्यात घ्या आणि त्यामध्ये दीड कप पाणी घालून मध्यम आचेवर 2 मिनिटे उकळण्यासाठी ठेवा. आता चव आणि रंगासाठी थोडी आपल्या नेहमीच्या चहाची पावडर घाला. आता 10 मिनिटे नीट उकळू द्या. या चहाला गोडी आणण्यासाठी त्यात थोडा मध घाला. झाला तयार आपला पेरू चहा!( Guava leaf herbal tea for good health)
मधुमेहापासून ठेवेल दूर
पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने मधुमेहाची समस्या देखील दूर होते. टाईप 2 मधुमेहाच्या समस्येने ग्रस्त असणाऱ्यांनी पेरूच्या पानांचा चहा अवश्य प्यावा. रिकाम्या पोटी पेरूच्या पानांचा चहा घेतल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहते.
कोलेस्ट्रॉल कमी होते
आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्यास घाबरू नका. यावर घरगुती उपाय म्हणून पेरूच्या पानांचा चहा घ्या. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात रक्त परिसंचरण प्रतिबंधित करते ज्यामुळे इतरही अनेक समस्या निर्माण होतात. एका अभ्यासानुसार, पेरूच्या पानांचा चहा सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी बर्याच प्रमाणात कमी होते, ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आरोग्यादायी फायदे मिळतात.
.(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Guava leaf herbal tea for good health)
हेही वाचा :
Hair Mask | केस गळती, रुक्षपणा समस्या होणार दूर, ‘हा’ हेअर मास्क ठरेल केसांसाठी वरदान!https://t.co/eedFAgnEcM#HairCare #HairMask
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2020