पेरुच्या बिया आहेत औषधी गुणांचा भांडार, ‘या’ आजारांपासून होईल मुक्तता

बहुतेक लोकांना पेरु हे फळ खायला आवडते. पेरु आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

पेरुच्या बिया आहेत औषधी गुणांचा भांडार, 'या' आजारांपासून होईल मुक्तता
पेरू
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 2:17 PM

मुंबई : बहुतेक लोकांना पेरु हे फळ खायला आवडते. पेरु आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पेरु त्वचा आणि केसांसाठी खूप पौष्टिक फळ आहे. पेरूमध्ये फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात असते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, फक्त पेरुच नाहीतर पेरुच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ज्यामुळे गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात पेरुच्या बिया खाण्याचे नेमके कोणते फायदे आहेत. (Guava seeds are beneficial for health)

-पेरुच्या बियामध्ये प्रथिने अधिक आढळतात. ज्यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी कमी होते. टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरु आणि त्याच्या बिया एक चांगला आहार आहे.

-पेरुच्या बिया खाल्याने आपले पाचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या देखील कमी होण्यास मदत होते.

-जर पेरुच्या पानांचा काढा डायबिटीजच्या रुग्णांना सकाळी रिकाम्या पोटी पिण्यास दिला तर, त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित होते. ज्यामुळे मधुमेहामुळे होणारे सर्व त्रास दूर होतात.

-पेरुमध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते. पेरूच्या दाण्यांमुळे शरीरातील कार्बोहायड्रेट कमी होते. यामुळे वजन कमी करणे सोपे होते. त्यात आढळणारे जीवनसत्त्वे आणि खनिजे यामुळे आपल्याला भूक देखील लागत नाही.

-लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण कोलेस्‍ट्रॉल असते. पेरूमधील उपस्थित तत्व कोलेस्‍ट्रॉल कमी करतात. यामुळे वजन वाढत नाही. त्यामुळे पुढील डायट शेड्युलमध्ये पेरूला नक्की स्थान द्या. उच्च रक्तदाब असणाऱ्यांना डॉक्टर पेरुच्या बिया खाण्याचा सल्ला देतात. पेरुच्या बियामध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असते जे रक्त प्रवाह नियंत्रित करते.

(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!

(Guava seeds are beneficial for health)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.