रात्री झोपताना वेणी घालणं योग्य की केस मोकळं ठेवणं? जाणून घ्या केसांसाठी बेस्ट पर्याय कोणता

केसांची वाढ होण्यासाठी आणि केस निरोगी राहण्यासाठी केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. रात्री झोपताना केस मोकळे ठेवून झोपायचे की केस बांधून झोपायचे या संभ्रमात अनेक जण असतात. जाणून घेऊ रात्री झोपताना केस मोकळे सोडणे योग्य आहे की बांधणे.

रात्री झोपताना वेणी घालणं योग्य की केस मोकळं ठेवणं? जाणून घ्या केसांसाठी बेस्ट पर्याय कोणता
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 3:51 PM

आपल्या रोजच्या दैनंदिन व्यस्त जीवनशैलीत केसांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे विशेषतः रात्री झोपताना. केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी झोपताना तुम्ही केस कसे ठेवता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक जण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात पण ही सवय तुमच्या केसांच्या आरोग्यावर खोलवर परिणाम करू शकते. काही लोकांना झोपण्यापूर्वी केसांची वेणी घालायला आवडते तर काहींना केस मोकळे सोडायला आवडते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या दोन पद्धतींपैकी कोणती पद्धत तुमच्या केसांसाठी योग्य आहे?

योग्य पद्धती न निवडल्यामुळे तुमचे केस गळणे टाळता येणार नाही. झोपताना केसांची वेणी घालायची की केस मोकळे ठेवायचे ते जाणून घेऊया. ज्यामुळे तुमचे केस निरोगी आणि सुंदर राहतील.

केसांची वेणी घालून झोपणे

तुमचे केस लांब असतील तर सैल वेणी घालून तुम्ही झोपू शकता. यामुळे केसांमध्ये गुंता होणार नाही आणि ते तुटणार नाही. वेणी खूप घट्ट घालू नका अन्यथा केसांच्या मुळावर दबाव येऊ शकतो. केसांची सैल वेणी घातल्यामुळे केसांची मूळ सुरक्षित राहतात आणि त्यांची नैसर्गिक वाढीची प्रक्रिया आहे चांगली राहते. यामुळे केसांची वाढ देखील होते. वेणी घालून झोपल्याने डोक्यावरील केस व्यवस्थित राहता. ज्यामुळे घाम येण्याची समस्या कमी होते. ही पद्धत विशेषतः उन्हाळ्यात आरामदायक ठरते.

हे सुद्धा वाचा

मोकळे केस ठेवून झोपणे

जर तुमचे केस लहान असतील किंवा तुम्हाला ते मोकळे ठेवून झोपायला आरामदायक वाटत असेल तर तुम्ही तुमचे केस मोकळे ठेवूनही झोपू शकता. पण केसांना गुंता होण्यापासून आणि तुटण्यापासून रोखण्यासाठी रेशीम किंवा माऊशीचा वापर करा. यामुळे घर्षण कमी होते आणि केसांची आर्द्रता टिकून राहते. घट्ट वेणी किंवा पोनी टेल घालून झोपल्याने केसांच्या मुळांवर दबाव येतो. केस मोकळे ठेवून झोपल्याने टाळू आणि केसांच्या मुलांना आराम मिळतो. ज्यामुळे केसांची नैसर्गिक वाढ होण्याची प्रक्रिया सुधारते. याशिवाय केस मोकळे ठेवल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते. हे केसांच्या मुळांना पोषण देते आणि मजबूत करण्यास मदत करते.

या गोष्टी लक्षात ठेवा

झोपण्यापूर्वी तुमचे केस हलक्या हाताने विंचरून घ्या. जेणेकरून ते गुंता होणार नाही. केस ओले असल्यास ते आधी कोरडे करा. ओले केस कमकुवत असतात आणि तुटू शकतात. आठवड्यातून एकदा मॉइश्चरायझिंग हेअर मास्क किंवा तेलाने केसांना मसाज करा यामुळे केस निरोगी राहतील.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.