द्राक्षं आवडतात म्हणून अतिरेक नको, शरीरावरील दुष्परिणाम माहितीयं का?
द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. परंतु त्याचे अतिसेवन केल्याने त्याची आरोग्यास हानी पोहोचू शकते. द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ल्याने यातून पोटाच्या, त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात.
सध्या द्राक्षांचा (grapes) हंगाम सुरु होण्यात आहे. नाशिक, सांगली आदी ठिकाणी द्राक्ष तयार होण्याची प्रक्रिया सुरु आहे. गारठा कमी झाला असून अजून आठवडाभरानंतर सुर्यप्रकाशामुळे द्राक्षांमध्ये गोडवा निर्माण होण्याची प्रकिया सुरु होईल. या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी मुबलक प्रमाणात द्राक्ष बाजारपेठांमध्ये दिसून येत असतात. द्राक्ष ठराविक सिजनमध्ये येत असल्याने अनेकांकडून त्यांना खाण्याला पसंती दिली जात असते. परंतु अनेक जण द्राक्ष आवडतात म्हणून त्याचा अतिरेक करतात. परंतु द्राक्षांच्या अतिसेवनामुळे शरीराला हानी (health disadvantages) पोहचू शकते. कुठलीही गोष्ट योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचा शरीराला उपयोग होत असतो. अतिरेक केल्यास याचे दुष्परिणाम (Side effects)शरीरावर दिसून येतात.
1) गरोदरपणात द्राक्ष टाळा
द्राक्षांमध्ये पॉलिफेनॉल नावाचे तत्व असते. याचे सेवन केल्याने मुलांमध्ये स्वादुपिंडाचा त्रास निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या काळात द्राक्षांचे सेवन टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत असतो.
2) किडनीची समस्या
किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनीही द्राक्षे जास्त प्रमाणात खाऊ नयेत. तज्ज्ञांच्या मते, द्राक्षांमुळे मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका अधिक वाढण्याची शक्यता असते. द्राक्षांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
3) त्वचेची अॅलर्जी
द्राक्षांचे अतिसेवन केल्यास त्वचेच्या विविध समस्या निर्माण होत असतात. तसेच त्वचेला खाज येण्याचा धोका निर्माण होउ शकतो. त्यामुळे द्राक्ष घातांना त्याचा अतिरेक करु नये, ज्या लोकांना कुठल्याही प्रकारच्या त्वचेशी संबंधित समस्या असतील त्यांनी. द्राक्षांचा अतिरेक टाळावा. अॅलर्जीमुळे पाय आणि हातांना खाज सुटण्याची शक्यता असते. त्याच प्रमाणे चेहऱ्यावर सूज येण्याच्या तक्रारीही असू शकतात.
4) पोटदुखी
जे लोक द्राक्षे जास्त प्रमाणात सेवन करतात, त्यांना पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात. यामध्ये अतिसाराचाही समावेश होतो. पोट आधीच खराब असलेल्या लोकांनी द्राक्ष खाणे टाळले पाहिजे.
5) वजन वाढण्याची शक्यता
भरपूर प्रमाणात द्राक्षे खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. वाढत्या कॅलरीजमुळे वजन वाढू शकते, द्राक्षांमध्ये ग्लुकोजेचे जास्त प्रमाण असल्याने यातून रक्तातील साखर वाढून मधुमेह होण्याचाही धोका नाकारता येत नाही.