Health | रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करताय? वाचा याचे दुष्परिणाम!

बर्‍याच वेळा आपण अनवधानाने अशा काही चुका करतो, ज्या आरोग्यास फायदा देण्याऐवजी हानी पोहचवतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी ही देखील यातीलच एक चूक आहे.

Health | रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करताय? वाचा याचे दुष्परिणाम!
लिंबू पाणी
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 5:42 PM

मुंबई : आजकाल मोठ्या संख्येने लोक आरोग्य आणि वजनाच्या दृष्टीने कॉन्शस बनले आहेत आणि म्हणून त्यांचे बहुतेक उपक्रम आरोग्य लक्षात घेऊन केले जातात. परंतु, बर्‍याच वेळा आपण अनवधानाने अशा काही चुका करतो, ज्या आरोग्यास फायदा देण्याऐवजी हानी पोहचवतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी ही देखील यातीलच एक चूक आहे. बरेच लोक शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि टॉक्सिक घटक उत्सर्जित करण्यासाठी लिंबू पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. लिंबाच्या रसाचे अनेक प्रकारचे फायदे असले, तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक देखील आहे (Health Side effects of Lemon Water).

लिंबूपाणी पिण्याचे दुषपरिणाम

दातांचे नुकसान

दररोज सकाळी लिंबूपाण्याचे सेवन केल्यास तुमचे दात खराब होऊ शकतात. यामागचे कारण असे आहे की, लिंबू खूप अम्लीय आहे आणि त्याच्या नियमित वापरामुळे दातांचा एनॅमल खराब होतो. तसेच, दातामध्ये संवेदनशीलता निर्माण होते. म्हणून, जास्त दिवस लिंबूपाण्याचे सेवन करणे टाळा. तथापि, यावर एक उपाय असा आहे की, आपण स्ट्रॉने लिंबू पाणी प्या, जेणेकरून दातांशी त्यांचा संपर्क कमी येईल. लिंबू पाणी पिल्यानंतर ब्रश देखील करू नका, फक्त पाण्याने गुळण्या करा.

छातीत जळजळ होण्याची समस्या

लिंबाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने छातीत जळजळ होण्यास त्रास होऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीस आधीपासूनच हा आजार असेल, तर त्यांनी लिंबाच्या पाण्यापासून दूर रहावे. हार्टबर्नला ‘अ‍ॅसिड रिफ्लक्स’ असेही म्हणतात, ज्यात पोटात तयार होणारे अ‍ॅसिड अन्न पचवण्यासाठी अन्ननलिकेकडे परत येते, ज्यामुळे छातीत दुखणे आणि जळजळ जाणवते. असे झाल्यास लिंबासह सर्व आम्ल पदार्थांचे कमीतकमी सेवन केले पाहिजे.

माऊथ अल्सर

जरी लिंबूपाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक प्रकारचे फायदे आहेत, परंतु आपल्याला तोंडात अल्सरची समस्या असल्यास, लिंबू पाणी अजिबात पिऊ नये. यामुळे तोंडातील फोड बरे होण्यापेक्षा अधिक गंभीर बनू शकतात. याशिवाय दररोज सकाळी रिकाम्या पोटावर जास्त प्रमाणात लिंबूपाण्याचे सेवन केल्यास तोंडात फोड व गॅस्ट्रोओफेझियल रिफ्लक्स डिसीज या सारखे आजारही उद्भवू शकतात (Health Side effects of Lemon Water).

डिहायड्रेशन

संशोधनानुसार, लिंबाच्या रसामध्ये एस्कॉर्बिक अ‍ॅसिड किंवा व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात आढळतो, ज्यामुळे मूत्रपिंडात मूत्र उत्पादन वाढते. यामुळे शरीरात साठलेले अतिरिक्त मीठ आणि द्रव काढून टाकण्यास मदत होते. परंतु, जर लिंबाचा जास्त वापर केला गेला तर वारंवार लघवी करावी लागेल, यामुळे शरीरात पाण्याची कमतरता उद्भवू शकते. म्हणून लिंबू पाणी कमी प्रमाणात प्या.

मायग्रेन

लिंबू आणि इतर लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्यामुळे मायग्रेनची समस्या देखील उद्भवू शकते. अनेक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, एखाद्या व्यक्तीस मायग्रेनचा त्रास होण्यापूर्वी किंवा तो मायग्रेनचा रुग्ण असेल तर त्याने लिंबाचे सेवन करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा त्याची समस्या आणखी वाढू शकते.

हाडांवर होणारा परिणाम

जर दररोज सकाळी भरपूर प्रमाणात लिंबाचे सेवन केले, तर त्याचा परिणाम तुमच्या हाडांवरही दिसून येतो. संशोधनानुसार, लिंबाचा रस हाडांमध्ये उपस्थित तेल शोषून घेतो, ज्यामुळे नंतर हाडांचा आजार उद्भवू शकतो. म्हणून लिंबूपाण्याचे कमी प्रमाणात सेवन करा आणि लिंबाचा हा दुष्परिणाम टाळण्यासाठी लिंबाच्या पाण्यात थोडासा मध घाला.

(Health Side effects of Lemon Water)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.