Eye Care | ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांची आग होतेय? चिंता नको, साधे-सोपे उपाय करा

ऑनलाईन क्लासेसमुळे अनेक मुलांना डोळ्यांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. डोळे आग होणे, त्यातून पाणी येणे, दुखणे आदी समस्या सामान्य आहे. डोळ्यांच्या समस्यांमुळे अनेकदा ऑनलाईन क्लासमध्ये सुरु असलेले शिकवणेही अनेकांना समजत नाही.

Eye Care | ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांची आग होतेय? चिंता नको, साधे-सोपे उपाय करा
सतत ऑनलाईन राहिल्याने मुलांच्या डोळ्यांना त्रास
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 12:16 PM

मुंबई : कोरोना काळापासून जणू काही सर्व जगच बदलून गेले आहे. कोरोनामुळे शाळा तसेच महाविद्यालये अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे मुलांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाकडून ऑनलाईन पध्दतीने शिकवणी वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. या माध्यमातून ऑनलाइन क्लासेस (online classes) करायची म्हणजे मुलांना तासंतास मोबाईल (Mobile) तसेच, संगणकासमोर बसणे भाग होते. यातून अनेकांना आता डोळ्यांच्या समस्या निर्माण झालेल्या आहे, डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होउन त्यातून पाणी येणे अशा अनेक समस्या मुलांना भेडसावू लागल्या आहे. अनेक जण मुलांच्या या तक्रारीकडे दुर्लक्षही करीत असतात. परंतु असे करणे तुमच्या मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरु शकते. या समस्यांकडे दुर्लक्ष न करता काही घरगुती उपाय आहे, ज्यांच्या माध्यमातून मुलांना डोळ्यांचा होत असलेला त्रास (children eye pain) काही अंशी कमी होउ शकतो.

20-20-20 फार्म्यूला

जर तुमच्या मुलाला डोळ्यात आग किंवा वेदना होत असेल तर त्याला 20-20-20 चा फार्म्यूला सांगा. त्यानुसार, त्याला 20 मिनिटांनंतर विश्रांती घेण्यास सांगा आणि या दरम्यान त्याला 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर पाहण्यास सांगा. असे केल्याने त्याच्या डोळ्यांना आराम मिळेल आणि तो अभ्यासातही लक्ष केंद्रित करू शकेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्याला घराबाहेर किंवा खिडकीबाहेर पाहण्यास सांगू शकता.

डोळे चोळू नका

अनेकदा डोळ्यांनाही काही होत असल्यास मुले दोन्ही हातांनी जोरजोरात डोळे चोळतात. परंतु हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. डोळ्यांची आग होत असताना मुलाला डोळे अजिबात चोळू देऊ नका. असे केल्याने त्याच्या डोळ्यांच्या समस्या वाढू शकतात.

डोळ्यांवर पाण्याचे हबके मारा

अनेकदा एकसारखे मोबाईल किंवा संगणकाकडे पाहत असल्याने डोळ्यांची आग होत असते. डोळ्यांमधून अनेकदा पाणीदेखील येत असते. अनेकदा डोळे कोरडे पडत असल्यानेही या समस्या निर्माण होउ शकतात. अशा वेळी डोळ्यांवर हलक्या हाताने पाण्याचे हबके मारा, यातून डोळ्यांना गारवा मिळेल व जळजळदेखील कमी होईल.

काकडीच्या फोडी ठेवा

डोळे आग होत असतील, किंवा डोळ्यांमधून गरम पाणी येत असेल तर अशा वेळी काकडीच्या कापा करुन त्या डोळ्यांवर काही मिनीटे ठेवल्यावर डोळ्यांची आग कमी होते. तसेच डोळ्यांना गारवादेखील मिळत असतो.

संबंधित बातम्या :

ही चार लक्षणे जी सांगतील मुलांना चष्मा लागण्याची चिन्हे

कोलेस्ट्रॉल वाढल्याच्या खुणा डोळ्यांवरही दिसतात? जाणून घ्या लक्षणं

डोळ्यांच्या समस्याने त्रस्त आहात?, तर आजच ‘या’ पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.