Relationship Tips : नातं जपा, नातं जगा; तुमची ‘ही’ चूक वेळीच सुधारा!

मनाची दरी रुंदावल्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. तुमच्या पार्टनरला खोटे बोलण्याची सवय असल्यास, ही सवय वाढतच जाते आणि तुमच्या ब्रेक-अपचे कारण बनू शकते. अशाच प्रकारच्या काही सवयी महिलांना पसंत नसतात. त्यामुळे तुमच्या पार्टनरसोबतचा दुरावा आणखीनच वाढतो.

Relationship Tips : नातं जपा, नातं जगा; तुमची ‘ही’ चूक वेळीच सुधारा!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 7:59 PM

नवी दिल्ली : नात्यात छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. छोट्या गोष्टीतील विसंवादातूनच मोठ्या समस्या आकाराला येतात आणि त्यामुळे मनाची दरी रुंदावल्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. तुमच्या पार्टनरला खोटे बोलण्याची सवय असल्यास, ही सवय वाढतच जाते आणि तुमच्या ब्रेक-अपचे कारण बनू शकते. अशाच प्रकारच्या काही सवयी महिलांना पसंत नसतात. त्यामुळे तुमच्या पार्टनरसोबतचा दुरावा आणखीनच वाढतो. (Healthy relationship requires mutual understanding analyse the mistakes)

1. आत्मकेंद्री वागणं

स्वतःबद्दल विचार करणं चुकीचे नाही. मात्र, दुसऱ्यांना दुःख पोहचवून किंवा त्यांचे नुकसान करुन आपला फायदा पाहण्यानं तुम्ही स्वार्थी बनता. तुमच्या पार्टनरसोबतही असंच वागणं कायम ठेवल्यास तुमची इभ्रत आणि प्रेम दोन्हीही लयाला जाण्याची शक्यता असते.

2…झूठ पे झूठ!

नेहमी खरं बोलणारा व्यक्ती सापडणं दुर्मिळच आहे. तुमच्या चुकांबद्दल तुम्ही माफी मागण्याऐवजी समर्थन करत असाल तर सत्यापासून तुम्ही दूर जाता. तुमची पत्नी किंवा मैत्रीणीच्या नात्याबाबत ही बाब तंतोतंत लागू होते.

3. विसंवादाने वाढे अंतर!

नात्यांत विसंवादाचा अभाव दुराव्याचं कारण ठरू शकतो. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असता आणि व्यस्त असल्यामुळे तुमच्या पार्टनरशी बोलणे टाळता. त्यामुळे पार्टनरच्या मनात शंकांची वादळे निर्माण होतात. नात्यात दूरावा निर्माण होण्यास सुरुवात होते.

4. नेहमीचे फ्लर्ट किंवा आकर्षण:

तुम्ही जबाबदार नात्यात असता कुमारवयात कळत-नकळत घडणाऱ्या गोष्टी निश्चितच टाळायला हव्यात. पत्नी असो किंवा मैत्रीण त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी निश्चितच आवडत नाहीत. तुमच्या अशा प्रकारच्यावागण्यामुळे व्यक्तिमत्व डागळले जाते.

5. जपावी आवड, निवड:

नात टिकविण्याच्या कसोटीत जोडीदाराचं मन सांभाळणं महत्वाच ठरतं. आवड-निवड न जपता केवळ स्वतः बद्दल विचार करणं तुमच्या जोडीदाराला आवडणार नाही. जोडीदाराला आपल्याविषयी काळजी नसल्याची भावना यामुळे निर्माण होऊ शकते.

इतर बातम्या

Photo Gallery: कपाटांमध्ये कचऱ्यासारख्या नोटा, रात्र सरली तरी नोटा मोजणे सुरूच; घबाड पाहून अधिकारीही चक्रावले

Strawberry Face Pack : ग्लोइंग त्वचा आणि पिंपल्स दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरी फेसपॅक अत्यंत फायदेशीर!

तिशितलं वृद्धत्व: उच्च रक्तदाब ते केसगळती; ‘या’ गोष्टी तुम्ही समजून घ्यायलाच हव्यात!

(Healthy relationship requires mutual understanding analyse the mistakes)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.