Holi special : होळी स्पेशल रेसिपी, आज बनवा स्वादिष्ट ‘बदाम थंडाई’, जाणून घ्या रेसिपी…
रंगांचा सण होळी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केला जाते. होळी म्हटलं की उत्साहाचं वातावरण आलंच. यानिमित्त सुट्टी असल्याने दिवसभर घरात बसून कंटाळा येतो. मग घरातील लोकांची खाण्याची मागणी वाढते. आता होळी म्हटलं की थंडाई आलीच. अशातच आम्ही तुम्हाला होळी आणि धुलिवंदनानिमित्त एक खास रेसिपी सांगणार आहोत. आज तुम्ही 'बदाम थंडाई' देखील बनवू शकता. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी.
मुंबई : रंगांचा (Colours) सण होळी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांची उधळण करत आनंदाच वातावरण निर्माण केलं जातं. देशासह राज्यभरात (State) हा सण ठिकठिकाणी साजरा केला जातोय. विशेष म्हणजे पारंंपरिक नृत्य देखील अनेक ठिकाणी होळीनिमित्त केलं जातं. याच दिवशी विविध प्रकारचे पदार्थही तयार केले जातात. होळी म्हटलं की उत्साहाचं वातावरण आलंच. यानिमित्त सुट्टी असल्याने दिवसभर घरात बसून कंटाळा येतो. मग घरातील (House) लोकांची खाण्याची मागणी वाढते. समोसा, कचोरी, गोड पदार्थ हे नेहमीचं झालं. त्यांना वागळं काहीतरी हवं असतं. यातच अनेकांना थंड काहीतरी लागतं. आता होळी म्हटलं की थंडाई आलीच. अशातच आम्ही तुम्हाला होळी आणि धुलिवंदनानिमित्त (Holi) एक खास रेसिपी सांगणार आहोत. आज तुम्ही ‘बदाम थंडाई’ देखील बनवू शकता. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी.
बदाम थंडाईचे साहित्य
- 1/4 कप बदाम
- 1/2 टीस्पून हिरवी वेलची
- 1/2 कप साखर
- 2 कप दूध
- 20 पांढरी मिरी
- 2 केशर धागे
हे वरील साहित्य तुम्हाला बदाम थंडाई बनवण्यासाठी लागेल. हे साहित्य घेऊन खालील पद्धतीनं तुम्हाला बदाम थंडाई झटपट बनवता येईल.
थंडाई कशी बनवायची
- आधी दूध मध्यम आचेवर उकळा. एका खोल पॅनमध्ये दूध मध्यम आचेवर उकळा. पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
- बदाम आणि काळी मिरी यांची पेस्ट बनवा. बदाम आणि काळी मिरी ब्लेंडरमध्ये टाका आणि पाणी घालून बारीक पेस्ट बनवा.
- बदामाची पेस्ट दुधात मिसळा आणि 3-4 तास फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर दूध, वेलची पूड, साखर, बदाम आणि काळी मिरी पेस्ट घालून मिक्स करा आणि मिश्रण फ्रिजमध्ये 3 ते 4 तास ठेवा. मिश्रण चाळणीतून गाळून घ्या. त्यात केशर घालून चांगले मिक्स करावे. त्यानंतर थंड सर्व्ह करावं.
बदामाचे फायदे
बदामामध्ये मॅंगनीज मुबलक प्रमाणात असते. हे हाडे मजबूत होण्यास मदत करतात. बदामामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, फॅटी अॅसिड आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाब (ब्लड प्रेशर) नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तर हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास देखील फायदा होतो. तुमची स्मरणशक्ती बदामामुळे सुधारते. मन तीक्ष्ण होते. तुम्ही भिजवलेले बदामही खाऊ शकता. हे पचायला खूप सोपे असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासही मदत होते. रोजच्या आहारात बदामाचाही समावेशही तुम्ही करू शकता. गरोदरपणात भिजवलेले बदाम खाणे खूप फायदेशीर आहे. त्यात फॉलिक अॅसिड असते. त्यामुळे बाळाची प्रसूती सुलभ होते. बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तरीही भिजवलेले बदाम खाऊ शकता.
इतर बातम्या