Long Hair | लांब केसांसाठी काय करावं? दाट, लांबसडक केसांसाठी ‘हे’ घरगुती उपाय
आज आम्ही तुम्हाला दोन प्रभावी गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे केस कमरेपर्यंत लांब होतील. यामुळे केसांना मुळापासून डोक्यापर्यंत पोषण मिळेल आणि केस चमकदार होतील आणि केस लांब होतील. केसांच्या वाढीसाठी काही प्रभावी घरगुती टिप्स जाणून घेऊया.
मुंबई: मुलींसाठी चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच केसांचे सौंदर्यही खूप महत्त्वाचे असते. केस लांब करण्यासाठी मुली काय करत नाहीत? यासाठी अनेकदा मुली बाजारात मिळणारी महागडी उत्पादनेही ट्राय करतात. पण त्यामुळे त्यांना काही विशेष फायदा होत नाही. नैसर्गिकरित्या लांब, दाट आणि रेशमी केस असलेल्या मुलींकडे पाहून आपण नेहमी विचार करतो की अशा सुंदर केसांसाठी त्या काय करत असतील?
केसांची देखभाल करायची असेल तर त्यांची तशी काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ, आठवड्यातून 3 ते 4 दिवस तेल लावणे. शॅम्पू नीट करणे. केसांना व्यवस्थित मसाज करणे वगैरे. मात्र, केसांची देखभाल करण्यासाठी तुम्ही बाजारातील गोष्टीं ऐवजी स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला काही दिवसांतच फरक दिसू लागेल. आज आम्ही तुम्हाला दोन प्रभावी गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे केस कमरेपर्यंत लांब होतील. यामुळे केसांना मुळापासून डोक्यापर्यंत पोषण मिळेल आणि केस चमकदार होतील आणि केस लांब होतील. केसांच्या वाढीसाठी काही प्रभावी घरगुती टिप्स जाणून घेऊया.
कंबरेपर्यंत लांब केसांसाठी घरगुती उपाय
अंड्याचा हेअर मास्क
जर तुम्हाला कंबरेपर्यंत लांब केस हवे असतील तर त्यासाठी तुम्ही केसांमध्ये अंडी लावू शकता. खरं तर अंड्यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. अंडी लावल्याने केसांना आवश्यक पोषण मिळेल. तसेच तुमचे केस दाट आणि सुंदर होतील. यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा अंड्याचा हेअर मास्क बनवून लावा. अंड्याच्या हेअर मास्क तयार करण्यासाठी तुम्ही अंडी फोडून नंतर त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि एक चमचा मध घाला. हा हेअर मास्क मुळांसह केसांना लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी डोके धुवून घ्यावे. व्हिटॅमिनने समृद्ध अंडी केस लांब करण्यास देखील मदत करतील.
कांद्याचा रस
केस लांब करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस देखील वापरू शकता. केसांच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. कांद्यामध्ये केस लांब करण्याचे गुणधर्म असतात. कांद्याचा रस केसांना लावणे खूप सोपे आहे. त्यासाठी कांद्याची गरज आहे. आता एका कापडात टाकून त्याचा रस काढावा. यानंतर कापूस किंवा बोटांच्या साहाय्याने डोक्यावर लावा. हे सुमारे 2 मिनिटे ठेवा आणि नंतर डोके धुवा. आठवड्यातून काही दिवस असे केल्याने तुम्हाला लांब केस मिळतील. तसेच तुमचे केसही चमकतील.