पायरीयामुळे त्रस्त आहात, करा हे घरगुती उपाय हिरड्यांची समस्या होईल दूर

पायरीयामुळे त्रस्त आहात, करा हे घरगुती उपाय हिरड्यांची समस्या होईल दूर (Home Remedies for reduce Gum Problems)

पायरीयामुळे त्रस्त आहात, करा हे घरगुती उपाय हिरड्यांची समस्या होईल दूर
पिवळे दात
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 1:28 PM

मुंबई : बरेच लोक योग्यरित्या ब्रश करत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या तोंडात बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. तोंडाला दुर्गंधी येणे, हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे आणि दात हलणे ही पायरियाची लक्षणे असू शकतात. पायरियामुळे हिरड्यांना सूज येते, दातात वेदना होतात. दातांमधून आणि हिरड्यांमधून रक्त येते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. तुम्ही घरगुतू उपचारानेही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. (Home Remedies for reduce Gum Problems)

हळद

पायरियापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हळदीचा उपयोग करु शकता. हळदीमध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक गुण असतात. यामध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टीरियल आणि अँटी सेप्टिक गुण असतात. एका भांड्यात थोडेसे सरसोचे तेल हळदीमध्ये मिसळून सकाळ-संध्याकाळ हिरड्यांवर लावून हलक्या हाताने मालिश करा आणि त्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करा.

कडुलिंब

कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुण असतात. तुम्ही पायरिया समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाचा वापर करु शकता. यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस काढून हिरड्यांच्या चारही बाजूला लावा आणि 10 ते 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने गुळणी करा. दररोज एकदा गुळणी केल्यामुळे पायरियाची समस्या दूर होण्यास मदत होते.

नारळ आणि तिळाच्या तेलाने मालिश

पायरिया दूर करण्यासाठी हिरड्यांची मालिश करा. हिरड्यांना मालिश करण्यासाठी तुम्ही नारळ आणि तिळाच्या तेलाचा वापर करु शकता. हिरड्यांना हे तेल लावून 15 मिनिटानंतर कोट पाण्याने धुवा. (Home Remedies for reduce Gum Problems)

पायरियाची कारणे

1. पायरियाची सुरुवात दातांची नीट देखभाल न केल्यामुळे होते. तसेच जर जेवण व्यवस्थित न पचले नाही तरीही पायरियाची समस्या उद्भवते. 2. लिव्हरच्या खराबीमुळे रक्तामध्ये आम्लता वाढत जाते. दुषित अम्लीय रक्तामुळे दात पायरियाने प्रभावित होतात. 3. मांसाहार, अन्य पचनास जड पदार्थ, पान, गुटखा, तंबाखू आदि पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन, तसेच जेवण नीट चावून न खाणे, अजीर्ण, बद्धकोष्ठता इत्यादी पायोरियाची मुख्य कारणे आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.