नवरी नटली…प्री-ब्राइडल ग्लोसाठी खास टिप्स

| Updated on: Dec 22, 2021 | 3:36 PM

सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यात नुकतंच आता कतरिनाचं लग्न झालं. त्या शाही लग्नसोहळात नवरी कतरिनाचं सौंदर्य खुलून दिसत होत. आपण लग्नात असंच सुंदर दिसावं असं प्रत्येक नवरीला वाटतं. यासाठी नवरी मुलगी मेकअप करून आपलं सौंदर्य खुलवतात. आम्ही तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी खास टिप्स देणार आहोत.

नवरी नटली...प्री-ब्राइडल ग्लोसाठी खास टिप्स
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

लग्नसोहळा हा प्रत्येकासाठी खास असतो. सहाजिकच आपण आपल्या लग्नाच्या दिवशी सर्वात स्पेशल दिसावं असं प्रत्येकीला वाटत असतं. यासाठी मेकअपसोबत आपण लग्नाच्या काही दिवसांपूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली तर नैसर्गिक ग्लो येणार. नववधूचं रुप खुलून दिसण्यासाठी काही ब्रायडल ब्युटी केअर रूटीन फॉलो केल्यास नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठीच या टिप्स नक्कीच तुमच्या उपयोगी येतील.

फेशियल

आपण फेशियल खास कार्यक्रम असलं की करतो. नववधूने साखरपुड्यासाठी फेशियल केलं असणार. पण आता लग्नासाठी नियमित फेशियल सुरू करा.. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होईल. तसंच त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी हायड्रेशन मिळेल. फेशियल केल्यामुळे त्वचेवरील रक्त पातळी वाढते. तर आपण हे फेशियल घरी देखील करू शकतो. घरगुती नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करून आपण चेह-याची चमक वाढवू शकतो. तुम्ही चंदन आणि मधाचा वापर करून फेशियल करू शकता. चंदन मध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ब्रेकआउट टाळण्यासाठी या फेशियलचा फायदा होतो. तर मधामुळे त्वचेला आर्द्रता मिळते. तसंच तुम्ही फेशियल झाल्यावर मुलतानी मातीचा पॅक लावा. या पॅकमुळे काळे डाग कमी होतात आणि डेड स्किन साफ होते. या पॅकसाठी एक चमचा मुलतानी मातीमध्ये दूध आणि मध मिसळा आणि ती चेह-यावर लावा.

एक्सफोलिएटर आणि सीरमचा वापर करा

रोजच्या धकाधकीमध्ये आपल्या चेह-यावरील चमक नाहीशी होते. चेहऱ्यावर डेड स्किन तयार होते. ही डेड स्किन काढण्यासाठी एक्सफोलिएटिंग उपयुक्त ठरते. यासाठी अक्रोड पावडर, मध आणि दही याचं मिश्रण तयार करा. आणि ते मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. त्यामुळे चेहऱ्यावरील छिद्र सहज उघडतात. या मसाजनंतर चेहऱ्यावर फेस सीरमचा वापर करा. यामुळे त्वचा हायड्रेट होऊन चेहऱ्यावरील काळे डाग आणि खुणा कमी करण्यास मदत करेल.

हेल्दी डाइट

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी निरोगी आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. योग्य आहार घेतल्यास आरोग्य उत्तम राहतं सोबतच सौंदर्य वाढविण्यासाठी त्याचा फायदा होतो.
त्यामुळे नववधूने जेवण्यावर खास लक्ष दिलं पाहिजे. तिने जेवण्यात व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. असं केल्यास काळे डाग, लालसरपणा, सुरकुत्या, बारीक रेषा, डाग, कोरडेपणा या समस्या दूर होण्यास मदत होते. संत्र्याचा रस आणि दह्याचाही जेवण्यात समावेश करा. यातून सगळ्यात जास्त व्हिटॅमिन डी मिळतं. तसंच अँटी-ऑक्सिडंटसाठी आहारात पपई, टोमॅटो, पालक याचा समावेश करावा.

केसांची निगा राखा

केस हे नववधूचं सौंदर्य खुलून दिसण्यात सगळ्या महत्त्वाची भूमिका निभावतात. हेअरस्टाईलचे आज अनेक सुंदर पर्याय आले आहेत. त्यामुळे नववधूने खास करून केसांची काळजी घ्यावी. केसांना नियमित तेल मसाज करा. जर तुमची टाळू तेलकट असेल किंवा कोंड्याची समस्या असेल तर तीन चमचे दही, एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस घालून हे मिश्रण टाळूला लावा. यामुळे टाळूची पीएच पातळी राखण्यात आणि स्वच्छ ठेवण्यास मदत होते. यात तुम्ही खोबरेल तेलचा वापर करू शकता. याचा फायदा तुमचे केस वाढण्यास होतो.

या टिप्सचा उपयोग केल्यास नववधू तिच्या लग्नात सुंदर दिसेल. तसंच या टिप्स इतर मुलींनी वापरल्यास त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होईल.

इतर बातम्या-

PM modi : पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस, मोदींनी विनायक राऊतांना विचारले…

जाधवांनी आधी शब्द मागे घेतले, अंगविक्षेपही, तरीही भाजप संतप्त, शेवटी बिनशर्त माफी, संपूर्ण घटनाक्रम