चमकदार आणि मुलायम केसांसाठी घरीच बनवा ‘हा’ शॅम्पू, केस होतील निरोगी
केस निरोगी करण्यासाठी बाजारात अनेक प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत, पण तरीही केस गळण्याची समस्या कायम आहे. तुम्ही घरीच केमिकल फ्री शॅम्पू तयार करू शकता, ज्यामुळे केस मुलायम होतील आणि केसांच्या इतर समस्यांपासून सुटका मिळेल.
बदलत्या हवामानाचा आरोग्यावर व त्वचेवर जसा परिणाम होतो तसा आपल्या केसांवर देखील परिणाम होतो. त्याचबरोबर प्रदूषण, कॉस्मेटिक उत्पादनांचा अतिवापर यामुळेही कधी कधी निर्जीव, दुतोंडी केस आणि केस गाळणाच्या समस्या निर्माण होतात. आजच्या काळात प्रत्येक तिसरी व्यक्ती, मग ती मुलगा असो वा मुलगी, केसांशी संबंधित समस्यांनी त्रस्त असल्याची तक्रार करताना दिसेल. या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नैसर्गिक गोष्टी अतिशय परिणामकारक ठरतात. शॅम्पू हे एक मूलभूत उत्पादन आहे जे बहुतेक लोक आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांमध्ये वापरतात. सध्या जर तुम्हाला निरोगी केस हवे असतील तर तुम्ही घरी काही नैसर्गिक घटकांसह शॅम्पू तयार करू शकता.
त्वचेप्रमाणेच हिवाळ्यात केसही खूप कोरडे होतात, ज्यामुळे केस गळणे, तुटणे, व दुतोंडी होणे यासारख्या समस्या त्रास देऊ लागतात. अशावेळी बाजारात मिळणारे केमिकलबेस्ड शॅम्पू तुमचे केस आणखी कोरडे बनवू शकतात, तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि निरोगी केसांसाठी घरच्या घरी शॅम्पू कसे तयार करावे हे जाणून घेऊया.
शॅम्पू बनवण्यासाठी लागणार ‘या’ गोष्टी
घरगुती शॅम्पू बनवण्यासाठी मेथीदाणे, तांदूळ, लाल कांदा, कढीपत्ता, कोरफड जेल, सुका आवळा, अळशी (केस धुताना फ्लॅक्स सीड्स आणि फोम) हे सर्व गोष्टी शॅम्पू तयार करण्यासाठी लागणार आहे. शॅम्पू बनवताना तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हे सर्व साहित्य आधीच गोळा करा.
अशा प्रकारे तयार करा शॅम्पू
शॅम्पू बनवण्यासाठी तांदूळ, रीठा, अळशी, मेथीदाणे, कोरफडीचे तुकडे, सर्व गोष्टी कमीत कमी दोन लिटर पाण्यात एका भांड्यात घेऊन रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते ८ लहान कांदा घेऊन त्याचे छोटे तुकडे करून या सर्व गोष्टी एका कढईत टाकून चांगले उकळावे.
जेव्हा पाणी घट्ट होण्यास सुरुवात होईल तेव्हा गॅस बंद करून काढून घ्यावे, त्यातील रीठाचे दाणे काढून टाकावे. या सर्व गोष्टी थंड झाल्यावर मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून बारीक पेस्ट तयार करून चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. रसायनांशिवाय फक्त आपला नैसर्गिक शॅम्पू तयार होईल.
शॅम्पू साठवण्याचा मार्ग
हा तयार झालेला शॅम्पू काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. तुम्ही हा शॅम्पू फ्रिजमध्ये ठेऊ शकता. तसेच जेव्हा तुम्ही केसांना शॅम्पू लावणार त्याच्या काही थोड्या वेळापूर्वी बाहेर काढा जेणेकरून ते खोलीच्या तापमानावर येईल. केस हलके ओले करा आणि हा शॅम्पू मुळापासून टोकापर्यंत लावल्यानंतर किमान दोन ते तीन मिनिटे ठेवा आणि नंतर मसाज करून केस स्वच्छ धुवून घ्या. असे तुम्ही आठवड्यातून केसांना शॅम्पु लावल्यास केस चमकदार आणि निरोगी राहतील.