कोरड्या आणि निर्जीव त्वचेसाठी मध आणि लिंबाचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा !
उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यात आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते.
मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यात आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. ज्यामुळे आपला चेहरा निस्तेज दिसतो. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या काळात पार्लरमध्ये जाणे देखील शक्य नाही. कोरडी आणि निर्जीव त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण घरगुती उपाय करून ही त्वचेची समस्या दूर करू शकतो. (Honey and lemon face pack is beneficial for dry and lifeless skin)
कोरडी आणि निर्जीव त्वचा दूर करण्यासाठी मध आणि लिंबाचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी लिंबाचा रस आणि मध मिसळा. हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स केले की, साधारण 10 मिनिटे तसेच ठेवा आणि संपू्र्ण चेहऱ्याला लावा. चेहऱ्यावरील पेस्ट कोरडी झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. लिंबू त्वचेत क्लींजिंग एजंट म्हणून काम करते आणि मध आपली त्वचा मॉइश्चराइझ ठेवते.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचा सुधारण्यास मदत करते. लिंबामुळे आपली त्वचा चमकदार होते. लिंबूमध्ये ब्लीचिंगचे गुणधर्म आहेत. ते त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकण्यास मदत करतात. लिंबू तेलकट त्वचेसाठी चांगले आहे. हे त्वचेचे अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते. लिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे. यामुळे मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होते. लिंबू हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते.
कोरड्या त्वचेच्या समस्येपासून मुक्त व्हायचे असेल, तर आपण मध वापरू शकता. मध आपली त्वचा हायड्रेट करण्यासाठी, तसेच निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करतो. कोरड्या त्वचेवर मध लावून आपण तिला मॉइश्चराइझ करू शकता. मध एक नैसर्गिक उत्पादन आहे, जे आपल्या त्वचेतील ओलावा नैसर्गिकरित्या पुन्हा परत आणण्याचे काम करते. दररोज मध लावल्याने त्वचा मऊ आणि निरोगी दिसते. त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत, जे आपल्या जखमा बऱ्या करण्यास मदत करतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Hair Mask | केस गळती, रुक्षपणा समस्या होणार दूर, ‘हा’ हेअर मास्क ठरेल केसांसाठी वरदान!https://t.co/eedFAgnEcM#HairCare #HairMask
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2020
(Honey and lemon face pack is beneficial for dry and lifeless skin)