प्रेग्नेंसी रोखण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या कशा पद्धतीने कार्य करतात?

How Birth Control Pills Work : प्रेग्नेंट न होण्यासाठी बहुतांश स्त्रिया गर्भनिरोधक औषधांचा वापर करतात. मात्र कधी विचार केला आहे का की ही औषधे शरीरात गेल्यावर असे काय करतात की ज्यामुळे स्त्री प्रेग्नेंट होत नाही, जाणून घेऊया ही औषधं कशा पद्धतीने काम करतात.

प्रेग्नेंसी रोखण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या कशा पद्धतीने कार्य करतात?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 4:57 PM

मुंबई : प्रेग्नेंसी रोखण्यासाठी अधिकाधिक महिला गर्भनिरोधक औषधांचा वापर करतात. अमेरिकन आरोग्य संस्था CDC च्या म्हणण्यानुसार जर गर्भनिरोधक औषधांचा वापर सावधपूर्वक केला तर 99.5% प्रेग्नेंसी रोखणे शक्य होते. पण कधी विचार केला आहे का की, ही औषधे शरीरात गेल्यानंतर असे काय करतात की महिला प्रेग्नेंट होऊ शकत नाही. चला तर मग जाणून घेऊया ही औषधे कशा पद्धतीने काम करतात. (how birth control pills work know the science behind it)

हेल्थलाईनच्या (Healthline) रिपोर्टनुसार, गर्भनिरोधक औषधांमध्ये कृत्रिम स्टेरॉईड हार्मोन असतात, औषधांच्या माध्यमातून हे कृत्रिम हार्मोन गर्भवती महिलांच्या शरीरात पोहोचल्यानंतर त्यांच्या पिट्यूटरी ग्‍लँड मधून निघणाऱ्या फॉलिकल स्‍टीमुलेटिंग हॉर्मोन (FSH) आणि ल्‍यूटीनायजिंग हार्मोनचा (LH) प्रभाव कमी करतात यामुळे प्रेग्नेंसी थांबवायला मदत होते.

ही औषधे फॉलिकल-स्‍टीमुलेटिंग हार्मोन (FSH) आणि ल्‍यूटीनायजिंग हार्मोनचे (LH) काम करण्याची क्षमता कमी करतात. असे झाल्यामुळे ओव्‍यूलेशनची प्रोसेस थांबली जाते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर भ्रूण विकसित होत नाही, यामुळे प्रेग्नेंसी थांबली जाते. मात्र या औषधांचा वापर करताना काही सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.

हेल्थलाईनचा (Healthline) रिपोर्ट नुसार, घरगुती औषधे घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक असते. जर तुम्ही डायबिटीज, किडनी, हार्ट या शिवाय अन्य कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल, तर यासंबंधीची माहिती डॉक्टरांना नक्की द्या. जर काही काळ आधी तुमची डिलिव्हरी झाली आहे आणि या औषधांचे सेवन तुम्ही करणार असाल त्या वेळेस सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्याच्या साईड इफेक्टपासून आपल्याला वाचता येऊ शकते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक औषधे घेणे अनेक साईड इफेक्टना कारणीभूत ठरू शकते. जसे की डोकेदुखी, झोप न येणे, थकवा येणे, मूड स्विंग होणे, वजन वाढणे आणि डिप्रेशन सारख्या समस्यांनी तुम्ही त्रस्त होऊ शकता. जर आधीपासून तुम्ही कोणत्या तरी आजाराचा सामना करत असाल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधांचे सेवन केले तर हार्ट अटॅक, रक्तामध्ये गाठी जमणे, हाय ब्लडप्रेशर आणि स्ट्रोकच्या रूपाने याचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसू शकतात.

इतर बातम्या

Side Effects of Fig : अंजीरचे अतिसेवन नकोच…होऊ शकते आरोग्याचे नुकसान!

Amritsar Famous Dishes : ‘या’ 5 स्वादिष्ट अमृतसरी डिशेस तुम्ही नक्की ट्राय करा!

Winter Skincare Tips : हिवाळ्यात मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!

(how birth control pills work know the science behind it)

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.