जगातील विविध देशांमध्ये कसा साजरा केला जातो व्हॅलेंटाईन डे? जाणून घ्या
14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. पण या दिवसाचा उत्सव आठवडाभर आधी 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो. जगातील विविध देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो ते जाणून घेऊ.

व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान चालणारा व्हॅलेंटाईन वीक कपल्स साठी खूप खास असतो. एकमेकांना प्रभावित करण्यासाठी भेटवस्तू देतात. भारतासह जगभरातील लोक या आठवड्याचा विशेष आनंद घेतात. पण जगभरात व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? जगभरामध्ये व्हॅलेंटाईन डे वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिवस साजरा करण्याच्या परंपरा आहेत. जाणून घेऊ विविध देशात व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो.
जपानमध्ये देतात चॉकलेट
जपानमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. या दिवशी महिला पुरुषांना चॉकलेट देतात. जपानमध्ये 1950 पासून ही परंपरा सुरू आहे. नंतर एक महिन्याने तिथे व्हाईट डे साजरा केला जातो जेव्हा पुरुष महिलांना काही भेटवस्तू देतात.
दक्षिण कोरिया मध्ये साजरा करतात ब्लॅक अँड व्हाईट डे
दक्षिण कोरियामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. 14 फेब्रुवारीला मुली आपले प्रेम व्यक्त करतात. मुली त्यांच्या जोडीदाराला चॉकलेट देतात. त्यानंतर 14 मार्चला व्हाईट डे साजरा केला जातो. या दिवशी पुरुष आपल्या भावना व्यक्त करतात. तर 14 एप्रिल ला ब्लॅक डे साजरा केला जातो. या दिवशी 14 फेब्रुवारीला एकटे असलेले लोक काळया रंगाचे कपडे घालतात.
फिनलैंड मध्ये चॉकलेट डे
फिनलैंड मध्ये व्हॅलेंटाईन डे हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. येथे मित्रमंडळींनाही शुभेच्छा देतात. लोक एकमेकांना कार्ड आणि भेटवस्तू पाठवतात. या दिवसाचा उद्देश केवळ प्रियकर आणि प्रियसी मधील नातेसंबंध नव्हे तर सर्व प्रकारचे नाते दृढ करणे हा आहे.
अमेरिकेमध्ये कैंडी हार्ट्स
अमेरिकेमध्ये व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी कॅन्टी हार्ट देऊन त्यांच्या भावना व्यक्त केल्या जातात. हृदयाच्या आकाराच्या कँडीज वर एकमेकांसाठी प्रेमळ संदेश लिहून त्या आपल्या जोडीदाराला दिल्या जातात.