जेवल्यानंतर किती वेळाने तुम्ही रनिंग करू शकता? तज्ञांकडून जाणून घ्या
धावणे हा देखील एक प्रकारचा व्यायाम आहे. म्हणून जेवण केल्यानंतर लगेच धावू नये. यामुळे आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. जेवण जेवल्यानंतर धावण्यापूर्वी किती वेळ थांबावे हे तज्ञांकडून जाणून घेऊया.

बदलत्या मौसमात आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण निरोगी आहारासोबतच व्यायाम देखील करत असतो. अशातच धावणे हा निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. आपल्यापैकी अनेकजण रोज सकाळी लवकर उठून रनिंग करायला जातात. पण जर ते चुकीच्या वेळी केले गेले, विशेषतः जेवल्यानंतर लगेच तर त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. जेवल्यानंतर किती वेळानंतर धावणे आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असू शकते हे अनेकांना जाणून घ्यायचे असते. अशातच तुम्ही जेवल्यानंतर लगेच धावण्यासाठी जात असाल तर त्याने तुमच्या शरीराला कोणते नुकसान होऊ शकते हे आपण जाणून घेऊयात…
आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की, जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नये. जेवल्यानंतर लगेच धावल्याने पोटाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला वेदना होऊ शकतात. जेवल्यानंतर किती वेळानंतर धावणे आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
किती वेळानंतर धावणे सुरू करावे?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेवल्यानंतर किमान 1ते 2 तासांचे अंतर राखले पाहिजे. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपली पचनसंस्था सक्रिय होते आणि शरीरातील बहुतेक रक्तप्रवाह पोटाकडे केंद्रित होतो. त्यामुळे आपले अन्न योग्यरित्या पचू शकेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही लगेच धावायला सुरुवात केली तर रक्ताभिसरण स्नायूंकडे सरकते, ज्यामुळे पचन प्रक्रियेवर परिणाम होतो.
जेवल्यानंतर लगेच धावायला जाण्याचे नुकसान
पचनाच्या समस्या: धावण्यामुळे पचनसंस्थेतील रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे गॅस, अपचन आणि आम्लता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
पेटके आणि पोटदुखी: जेवणानंतर लगेच धावण्यामुळे पोटात पेटके येऊ शकतात, ज्यामुळे धावताना अस्वस्थता निर्माण होते.
उलट्या किंवा मळमळ: विशेषतः जर तुम्ही हेल्दी किंवा प्रथिनेयुक्त जेवण सेवन केले असेल तर लगेच धावल्याने उलट्या किंवा मळमळ सारख्या समस्या उद्भवू शकतात.
थकवा आणि चक्कर येणे: जेवल्यानंतर, शरीर पचनासाठी ऊर्जा वापरते. जर तुम्ही यावेळी धावलात तर तुम्हाला लवकर थकवा जाणवेल आणि चक्करही येऊ शकते.
परॅफॉर्मंसवर परिणाम: जर तुम्ही फिटनेस किंवा प्रशिक्षणासाठी धावत असाल तर जेवल्यानंतर लगेच धावल्याने तुमच परॅफॉर्मेंस कमी होऊ शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)