Immunity Booster : कोरोना काळात ‘हळदी’चे सेवन ठरेल गुणकारी, तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य मात्रा !
ध्या आपल्या देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील वर्षाच्या पहिल्या लाटेपेक्षा यावेळीचा कोरोना अधिक धोकायदायक आहे.
मुंबई : सध्या आपल्या देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील वर्षाच्या पहिल्या लाटेपेक्षा यावेळीचा कोरोना अधिक धोकायदायक आहे. ज्येष्ठ नागरिक ते लहान मुले यांना देखील कोरोना होण्याचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या लोकांना तर कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी एकच पर्याय उत्तम आहे. तो म्हणजे या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे. (how much turmeric will be taken at one time know deatils)
हळद रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रभावी आहे. हळद ही प्रत्येकाचा स्वयंपाक घरात वापरली जाते. हळदमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आपल्या शरीरास संक्रामक रोगांपासून संरक्षण करतात. कोरोना कालावधीत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बहुतेक लोक हळदीचे सेवन करतात. मात्र, हळदीचे योग्य प्रमाणात सेवन करणे खूप महत्वाचे आहे. हळद ही गरम असते, हळदीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आपल्या शरीरास नुकसान होऊ शकते.
एक व्यक्ति को हल्दी कितनी मात्रा में लेनी चाहिए ?#IndiaFightsCorona | #COVID19 @PrakashJavdekar | @MIB_India | @PIB_India @moayush pic.twitter.com/JdY9mW28sq
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) July 15, 2020
आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्या म्हणण्यानुसार हळद नेहमीच मर्यादित प्रमाणात खायला हवी. कोटेचाच्या मते, ताजी हळद आणि सुकलेली हळद आपण खाऊ शकता. मात्र, जर हळद ताजी असेल तर जास्त प्रमाणात आहारत घेऊ शकतात. कारण ताज्या हळदीत औषधी घटक डायल्यूटेड होतात. 200 मिली कपसाठी 4 ग्रॅम हळद पुरेसे असते तर 3 ग्रॅम हळद 150 मिली कपसाठी देखील पुरेसे असते. कोटेचा पुढे म्हणाले की, जास्त हळदीचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.
हळदीमध्ये औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. जर हळदयुक्त दूध घेतले तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे हळद दूध तयार करण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही. हळदीयुक्त दूध तयार करण्यासाठा फक्त हळद आणि दूधाची गरज असते. दोन लोकांसाठी हळदीचे दुध तयार करण्यासाठी एका भांड्यात दोन ग्लास दूध घालून त्यात चिमूटभर हळद मिसळा आणि उकळवा.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
(how much turmeric will be taken at one time know deatils)