नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन कसे वाढवायचे? बाबा रामदेव यांची ‘ही’ पद्धत अवलंबा
जर तुम्हाला कमी हिमोग्लोबिनची समस्या असेल आणि तुम्हाला ते नैसर्गिकरित्या वाढवायचे असेल तर तुम्ही बाबा रामदेव यांनी दिलेल्या टिप्स फॉलो करू शकता. या उपायाने फक्त 7 दिवसांत निकाल दिसून येईल. तो उपाय काय आहे ते जाणून घ्या.

आपल्यापैकी अनेकांना हिमोग्लोबिनची समस्या सतावत असते. कारण शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यात बहुतेकवेळा महिला आणि मुलांना यांचा जास्त त्रास होतो. शरीरात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी आणि त्वचेचा रंग बदलणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर यावर वेळीच उपचार केले नाहीत तर अनेक आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. तर यावेळी बाबा रामदेव यांच्या मते, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून शरीराला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय संपूर्ण पोषक तत्वाचा लाभ मिळेल.
अशातच बाबा रामदेव यांनी एका व्हिडिओमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्याचा एक उत्तम नैसर्गिक उपाय देखील सांगितला आहे, जो तुम्ही फक्त 7 दिवस केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. आता ते उपाय कोणते आहेत. तसेच ते कसे बनवायचे आणि त्याचे इतर फायदे काय आहेत हे आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…
बाबा रामदेव यांनी सांगितलेला उपाय
बाबा रामदेव यांनी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी एका उत्कृष्ट ज्यूस बद्दल सांगितले आहे. ज्याच्या सेवनाने तूमच्या शरीरातील रक्तातील कमतरता भरून निघते. तसेच हा ज्युस बनवणे देखील खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला डाळिंब, बीट, आले आणि आवळा लागेल.
ज्यूस कसा बनवायचा
सर्वप्रथम, डाळिंब सोलून घ्या, गाजर, बीट आवळा आणि आले यांचे लहान तुकडे करा. आता या सर्व गोष्टी मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर त्यात तयार झालेला रस गाळून ग्लासमध्ये काढा. त्यात अर्धा लिंबू पिळून लगेच प्या. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते गाळून न घेता तसेच पिऊ शकता, जेणेकरून शरीराला त्यात असलेले फायबर देखील मिळू शकेल.
View this post on Instagram
ते कसे प्यावे आणि कधी प्यावे?
बाबा रामदेव यांनी सांगितले की, सकाळी रिकाम्या पोटी ते प्यायल्याने तुम्हाला या ज्यूसचा खूप लवकर फायदे दिसून येतील. कमीत कमी 7-10 दिवस ते नियमितपणे प्या, मग तुम्हाला त्याचा परिणाम स्वतः जाणवेल. जर तुम्हाला हिमोग्लोबिनच्या कमतरतेबद्दल जास्त काळजी वाटत असेल तर तुम्ही ते दिवसातून दोनदा (सकाळी आणि संध्याकाळी) घेऊ शकता.
या ज्यूसचे फायदे
1. हिमोग्लोबिन वेगाने वाढवते- डाळिंब, बीट आणि गाजर हे लोहाचे उत्कृष्ट स्रोत आहेत, जे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास आणि हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करतात. आवळा आणि लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी लोहाचे शोषण जलद करते, ज्यामुळे शरीराला अधिक पोषण मिळते.
2. शरीरात ऊर्जा आणि शक्ती वाढवते – हा ज्यूस शरीरातील लाल रक्तपेशी (RBCs) वाढविण्यास मदत करतात. ज्यामुळे ऑक्सिजनचा योग्य प्रवाह सुनिश्चित होतो आणि थकवा, अशक्तपणा आणि आळस दूर होतो. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला डिटॉक्स करतात आणि पेशी निरोगी ठेवतात.
3. त्वचा चमकदार आणि निरोगी बनवते- हिमोग्लोबिनची पातळी कमी असल्याने त्वचा फिकट आणि निर्जीव होऊ शकते. या ज्यूस मध्ये असलेले बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि लोह हे सर्व घटक त्वचेची चमक आणि ओलावा टिकवून ठेवतात. हे सुरकुत्या आणि पिगमेंटेशनची समस्या देखील कमी करते.
4. पचन सुधारते – बीट आणि आले पचन सुधारतात आणि आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्यांपासून आराम देतात. हे यकृताला डिटॉक्स करते, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
5. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते- आवळा आणि आले शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. याशिवाय, ते सर्दी, संसर्ग आणि ॲलर्जीपासून संरक्षण करते.