‘हेल्दी डाएट’च्या नावाखाली विषारी घटकांचे सेवन करताय? थांबा! आधी खाद्यपदार्थांची शुद्धता तपासा

फक्त डाळींच्याच बाबतीत नाही, तर आपण दररोज निरोगी अन्न म्हणून सेवन करत असलेल्या दूध, मसाले, हिंग इत्यादी अनेक गोष्टींमध्ये भेसळीचे बरेच प्रकार समोर आले आहेत.

‘हेल्दी डाएट’च्या नावाखाली विषारी घटकांचे सेवन करताय? थांबा! आधी खाद्यपदार्थांची शुद्धता तपासा
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 4:13 PM

मुंबई : काही काळापूर्वी, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) ग्राहकांना मूग व मसूर खाऊ नये, असा इशारा दिला होता. कारण, प्रयोगशाळेच्या तपासणी दरम्यान या डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी घटक आढळले होते. खरं तर, भारतात कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांकडून मोठ्या प्रमाणात मूग आणि मसूर आयात केली जाते. तपासादरम्यान एफएसएसएआयला या डाळींमध्ये ‘हर्बिसाईड ग्लायफोसेट’ नावाचे रसायन मोठ्या प्रमाणात आढळले होते (How to check the purity of pulse, grains, and other food ingredients).

‘हर्बिसाईड ग्लायफोसेट’ हे काही वर्षांपर्यंत आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित मानले जात होते. परंतु, डब्ल्यूएचओने अलीकडेच त्याचे सेवन थांबवण्याचा सल्ला दिला आहे. याचे कारण म्हणजे त्यात कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक आढळले आहेत. हे फक्त डाळींच्याच बाबतीत नाही, तर आपण दररोज निरोगी अन्न म्हणून सेवन करत असलेल्या दूध, मसाले, हिंग इत्यादी अनेक गोष्टींमध्ये भेसळीचे बरेच प्रकार समोर आले आहेत. हे भेसळयुक्त पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अगदी विषाइतके हानिकारक आहेत. जाणून घेऊया या पदार्थात कशी मिसळ होते आणि या गोष्टींची शुद्धता कशी ओळखावी…

डाळी

सामान्यत: बाजारात विकल्या जाणाऱ्या डाळींचा रंग टिकवण्यासाठी त्या ‘मेन्टील ​​यलो पेंट’ने रंगवल्या जातात. त्याची तपासणी करण्यासाठी आपल्याला हायड्रोक्लोरिक अॅसिडची आवश्यकता असते. चाचणीसाठी थोडी मसूर डाळ घेऊन ती पाण्यात टाका आणि त्या पाण्यात हायड्रोक्लोरिक अॅसिडचे चार थेंब घाला. जर, मसूर डाळीमध्ये भेसळ केली तर पाण्याचा रंग लाल होईल. असे आढळल्यास सावधगिरी बाळगा अन्यथा मूत्रपिंडासंबंधित समस्या किंवा पाचन तंत्राचा त्रास होऊ शकतो. याच पद्धतीने आपण हळदीची शुद्धता देखील तपासू शकता.

दूध

दुधाची शुद्धता तपासण्यासाठी आपल्याला लॅक्टोमीटरची आवश्यकता लागते. याशिवाय दुधात नायट्रिक अॅसिडचे दोन थेंब मिसळून देखील शुद्धता तपासता येते. नायट्रिक अॅसिड मिळताच दूध आणि पाणी दोन्ही आपोआप वेगळे होते (How to check the purity of pulse, grains, and other food ingredients).

लाल तिखट / मसाला

वीट किंवा मातीची बारीक भुकटी लाल तिखट किंवा मसाल्यात भेसळ करण्यासाठी वापरली जाते. त्यासह यात कृत्रिम रंगही मिसळला जातो. या चाचणीसाठी पाण्यात लाल मिरची घाला आणि काही वेळ थांबा. जर, लाल तिखट पाण्यावर तरंगताना दिसत असेल, तर ते शुद्ध आहे. परंतु, जर ते तळाशी गेले तर, त्यात भेसळ आहे.

हिंग

शुद्ध हिंग जाळले असता, ते प्रकाशित होते. व्यतिरिक्त शुद्ध हिंग पाण्यात टाकले असता, त्याचा रंग दुधीच्या रंगाप्रमाणे होते. जर असे काही घडले नाही तर ते भेसळयुक्त हिंग असू शकते.

वाटाणे

मटारच्या दाण्यांवर हिरवा रंग वापरला जातो, जो शरीरासाठी खूप हानिकारक आहे. त्याची शुद्धता तपासण्यासाठी, मटार काही वेळासाठी पाण्यात भिजवून ठेवा. भेसळयुक्त असल्यास मटारचा हिरवा रंग निघून जाईल.

काळी मिरी

काळ्यामिरीत भेसळ करताना त्यात पपईच्या बिया सुकवून त्या मिसळल्या जातात. जर आपल्याला याची शुद्धता तपासायची असेल, तर काळीमिरी पाण्यात टाका. काळीमिरी पाण्यात बुडेल, तर पपईचे दाणे पाण्यावर तरंगू लागतील.

(How to check the purity of pulse, grains, and other food ingredients)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.