अगदी नव्यासारखे दिसेल तुमचे बाथरुम, फक्त करा ‘हे’ उपाय, काही क्षणात…
तुमच्या घरातील बाथरूमच्या भिंती नव्या सारखे करण्यासाठी बेकिंग सोडा, व्हिनेगर, लिंबू आणि हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर करावा.व या आनखी काही घरगुती उपायांनी काही मिनिटांतच भिंतींवरील पिवळेपणा आणि डाग दूर करुण आणि बाथरूम अगदी नव्या सारखे चमकवा.

बाथरूमच्या स्वच्छतेवरून घर स्वच्छ आहे की नाही हे ठरवले जाते. अनेकदा बाथरूम स्वच्छ केल्यावरही ते पिवळसर दिसतं आणि त्यावरचे डाग फक्त साबणाने जात नाहीत. बाजारात अनेक साबण उपलब्ध असले तरी, या लेखात घरगुती उपायांनी बाथरूमला नव्यासारखी चमक कशी आणायची हे सांगितलं आहे. तुम्ही घरगुती उपायांनी बाथरूम अगदी नवीनसारखे स्वच्छ करू शकता.
साहित्य
½ कप बेकिंग सोडा
½ कप पांढरा व्हिनेगर
२ चमचे लिंबाचा रस
½ बादली कोमट पाणी
१ चमचे डिश वॉश लिक्विड (जर डाग अधिक असतील तर)
सर्व साहित्य बादलीत कोमट पाण्यात मिसळा आणि चांगले हलवा. हे मिश्रण स्पंज किंवा स्क्रबरच्या मदतीने भिंतींवर लावा. १०-१५ मिनिटे थांबा, ज्यामुळे काजळी मऊ होईल. नंतर हलक्या हाताने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. भिंती कोरड्या कापडाने किंवा वायपरने पुसून टाका. या उपायामुळे भिंतींचा पिवळसरपणा लगेच साफ होईल. त्या चमकदार दिसू लागतील.
1. बेकिंग सोडा आणि व्हिनेगरची कमाल
कसे वापरावे: १ कप व्हिनेगर + ½ कप बेकिंग सोडा + १ लिटर पाणी मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून भिंतींवर शिंपडा. १५ मिनिटांनी स्क्रब करा आणि पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्याने भिंती स्वच्छ राहतील.
2. लिंबू आणि मीठ यांचे मिश्रण
कसे वापरावे: १ लिंबाचा रस + २ चमचे मीठ मिसळून पेस्ट तयार करा. स्पंजने भिंतींवर लावा आणि ५-१० मिनिटांनंतर स्वच्छ करा.
हे उपाय टाइल्ससाठी देखील प्रभावी आहे.
3. हायड्रोजन पेरोक्साइड आणि बेकिंग सोडा
कसे वापरावे: ½ कप हायड्रोजन पेरोक्साइड + ½ कप बेकिंग सोडा मिक्स करा. ते भिंतींवर लावा, १५ मिनिटे सोडा आणि नंतर स्क्रब करा.
महिन्यातून एकदा हा उपाय केल्याने खोल घाण जमणार नाही.
4. टूथपेस्टची कमाल
कसे वापरावे: स्पंजवर थोडी पांढरी टूथपेस्ट घ्या आणि ती थेट डागावर घासून घ्या. ५ मिनिटांनी ओल्या कापडाने पुसून टाका. हा उपाय लवकर साफसफाईसाठी एकदम योग्य आहे.