दिवाळीला जुने सोन्याचे दागिने अशा प्रकारे करा स्वच्छ, नवीन असल्यासारखे चमकतील

Diwali 2023 : दिवाळीत धनतेरस आणि लक्ष्मी पूजनच्या दिवशी सोन्याच्या दागिण्यांची पूजा देखील केली जाते. या दिवाळीला तुमचे जुने दागिने नवीन दागिन्यासारखे चमकवण्यासाठी खालील दिलेल्या टीप्स तुम्ही वापरु शकता. यामुळे तुमचे दागिने पुन्हा चमकू लागतील.

दिवाळीला जुने सोन्याचे दागिने अशा प्रकारे करा स्वच्छ, नवीन असल्यासारखे चमकतील
Gold clean
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 7:11 PM

How to clean gold Jewellery : दिवाळीत सोन्याच्या दागिन्यांची देखील पूजा केली जाते. पण हे जुने दागिने काही वेळानंतर काळे पडतात. भारतात दागिने घालणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. अनेकांना सोन्याची दागिने घालायला आवडतात. 2021 मध्ये भारतात 611 टन सोने खरेदी केले होते. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने खरेदी करणारा सर्वात मोठा ग्राहक आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या दिवशीही सोन्याच्या दागिन्यांना खूप महत्त्व असते. चला तर मग जाणून घेऊया दागिने कसे स्वच्छ करायचे.

सोन्याचे दागिने कसे स्वच्छ करावे?

१. डिश सोपची मदतीने करा स्वच्छ

सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात लिक्विड डिटर्जंट मिसळा. दागिने त्यामध्ये बुडवा आणि काही वेळ तसेच राहू द्या, नंतर मऊ ब्रशच्या मदतीने ते स्वच्छ करुन घ्या. शेवटी दागिने स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर, मऊ कपड्याने पुसून टाका.

2. टूथपेस्टने स्वच्छ करा

दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जाणारी टूथपेस्ट सोने स्वच्छ करण्यासाठी देखील वापरु शकता. दागिने स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात टूथपेस्ट घ्या. त्यामध्ये पाण्याचे काही थेंब टाकून एकत्र करून पातळ पेस्ट तयार करा. आता ब्रशच्या मदतीने दागिने स्वच्छ करा आणि नंतर व्यवस्थित धुवून घ्या.

3. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

एका भांड्यात बेकिंग सोडा आणि गरम पाणी मिक्स करा. आता ही पेस्ट दागिन्यांवर लावा. प्रथम पांढऱ्या व्हिनेगरने धुवा आणि नंतर पाण्याच्या मदतीने पूर्णपणे स्वच्छ करा. दागिने नवीन असल्या सारखे चमकतील.

या गोष्टींची काळजी घ्या

सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी ब्लीचचा वापर करू नका, त्यामुळे दागिने खराब होतात.

आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.