AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय म्हणता? वजन वाढतच नाही?; एक काम करा, ही गोष्ट करून पाहाच…

अनेकांना वजन वाढीचीही समस्या असते. आम्ही तुमहाला वजन वाढवण्यासाठी एक संपूर्ण चार्ट दिलेला आहे. वजन कमी असणाऱ्यांसाठी हा डाएट प्लानचा चार्ट उपयुक्त आहे. यात एक तपशीलवार आहार योजना आहे. हे आहार आणि जीवनशैलीतील काही बदल करून वजन वाढवण्यात मदत करेल.

काय म्हणता? वजन वाढतच नाही?; एक काम करा, ही गोष्ट करून पाहाच...
weight Image Credit source: Francesco Carta fotografo/Moment/Getty Images)
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 1:42 AM

सध्या लोक एका गोष्टीने त्रस्त आहेत, ती म्हणजे वजन कसं कमी करायचं? स्थुलपणा कसा घालवायचा. त्यासाठी लोक पाहिजे ती कसरत करताना दिसत आहेत. वजन नियंत्रणात आणणं ही प्रत्येकाची समस्या होऊन बसली आहे. त्यामुळेच प्रत्येकाचे वजन नियंत्रणासाठी लोक शक्य तितके प्रयत्न सुरू आहेत. पण काही लोक कमी वजनामुळेही त्रस्त असतात हे माहीत आहे का? अनेक लोक आपलं वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहतात. मात्र, वजन कमी करण्यासारखेच वजन वाढवणे हे सहज सोपे काम नाही. त्यासाठीही प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागतेच.

वजन कमी असलेल्या लोकांची शरीरयष्टी अत्यंत बारीक असते. त्यामुळे लोक अशा लोकांना नावे ठेवतात. त्यांची खिल्ली उडवतात. त्यामुळे हे लोक वजन वाढवण्याच्या मागे असतात. पण त्यांना हवा तो रिझल्ट मिळत नाही. विशेषतः ज्यांचे चयापचय (मेटाबोलिझम) खूप जलद आहे, अशा लोकांना वजन वाढवताना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक लोक योग्य आहार आणि व्यायाम करत असले तरी त्यांचे वजन वाढत नाही.

जर तुम्ही देखील असाच प्रयत्न करत असाल आणि परिणाम दिसत नसल्याने नैराश्य आले असेल, तर चिंता करू नका. आपल्या आहार आणि जीवनशैलीत काही बदल केल्यास तुम्ही अपेक्षित यश मिळवू शकता. वजन वाढवण्यासाठी, आहारात कॅलोरींच्या प्रमाणात वाढ करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे, आम्ही दिलेल्या डाएट प्लॅनचा अवलंब केल्यास तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात.

असा आहे डाएट प्लान

नाश्ता :

सकाळी 2 पिकलेली केळी आणि एक कप पूर्ण क्रीम दूध घ्या. कारण केळी आणि दूध दोन्ही कॅलरी आणि पोषणाने भरपूर असतात. नंतर 3 उकडलेली अंडी किंवा ऑम्लेट खा. काही वेळाने, 2 तासाच्या अंतराने 2 रोटीवर पीनट बटर लावून खा.

दुपारच्या आधीचा आहार :

दुपारच्या आधी दूध, केळी आणि पीनट बटर मिक्स करून शेक तयार करा. सफरचंद किंवा डाळिंब यासारख्या फळांचा त्यात समावेश करा. त्यामुळे तुमच्या शरीराला प्रथिने मिळतील आणि पोट भरलेले असेल.

दुपारचे जेवण :

दुपारच्या जेवणात भात आणि डाळ खा. त्यासोबत तूपात शिजवलेल्या हिरव्या भाज्या खा. 100 ग्रॅम पनीर आणि 2-3 चपात्या खा.

संध्याकाळचा नाश्ता :

संध्याकाळी 5-6 वाजता बदाम आणि आक्रोड खा. त्याने वजन वाढेल. सोबत चहा किंवा कॉफी प्या. आणि मल्टिग्रेन बिस्किट खा.

रात्रीचे जेवण :

रात्री 100-150 ग्रॅम ग्रील्ड चिकन किंवा मासे खा. यासोबत 1-2 चपात्या आणि अर्धा कप भात खा. त्यासोबत ताज्या भाज्यांचा सॅलड आणि 1 वाटी दही खा. झोपायला जाताना हळदीचे किंवा मधाचे दूध प्या.

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.