डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी काय करायचं?

अनेकांना डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या असते, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या सौंदर्याला ग्रहण लागतं. अशातच आज आम्ही तुम्हाला डार्क सर्कलसाठी केळीच्या सालींचा वापर कसा करावा हे सांगणार आहोत.

डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी काय करायचं?
Dark circlesImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 7:23 PM

डोळे ही माणसाची ओळख आहे. त्यामुळे आकर्षक डोळे मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या असते, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या सौंदर्याला ग्रहण लागतं. अशातच आज आम्ही तुम्हाला डार्क सर्कलसाठी केळीच्या सालींचा वापर कसा करावा हे सांगणार आहोत. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडेंट्सचे प्रमाण चांगले असते, जे डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि संवेदनशील त्वचा कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

केळीची साल व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि झिंक सारख्या गुणधर्मांचा साठा आहे, ज्यामुळे आपल्या त्वचेला सखोल पोषण मिळू शकते. इतकंच नाही तर केळीची साल त्वचेतील कोलेजन वाढवण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उपयुक्त आहे, तर चला जाणून घेऊया डार्क सर्कलसाठी केळीची साल कशी वापरावी.

डार्क सर्कलसाठी केळीची साल

पहिला मार्ग

त्यासाठी आपण प्रथम केळीची साल घेऊन सुमारे १५ ते २० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी. मग तुम्ही त्यांना फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा. त्यानंतर आपण ही साल सुमारे 15 मिनिटे डोळ्यांखाली ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. आठवड्यातून २ ते ३ वेळा ही रेसिपी अवलंबली तर चांगले परिणाम मिळतात.

दुसरा मार्ग

यासाठी आपण प्रथम केळीची साल बारीक करा किंवा त्यांचे लहान तुकडे करा. नंतर केळीच्या पेस्टमध्ये कोरफड जेल घालून मिक्स करा. यानंतर तयार केलेली पेस्ट डोळ्यांखाली जाड थरात तयार करून लावा. नंतर थोड्या वेळाने चेहरा धुवून टाका. रात्रीच्या वेळी डोळ्याखालचा मास्क लावा.

तिसरा मार्ग

यासाठी प्रथम केळीची साल बारीक करून घ्या. नंतर या पेस्टमध्ये सुमारे 2-3 थेंब लिंबाचा रस आणि मध घालून मिक्स करा. त्यानंतर तयार केलेली पेस्ट डोळ्यांखाली लावा. यानंतर साधारण ८ ते १० मिनिटे लावा. नंतर डोळे धुवून हलक्या हातांनी थापून डोळे स्वच्छ करावेत. यामुळे त्वचेला पुरेसा ओलावा मिळेल आणि डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.