आजारांपासून दूर राहा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे 7 घरगुती उपाय
जर रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाली तर आजारी पडण्याची शक्यता अधिक (Immunity Power Increase Food) असते.
मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Immunity Power Increase Food) आहे. कोरोना रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली असून पुण्यात सर्वाधिक 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनासह इतर संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे.
आपल्या शरीरातील इम्यून सिस्टममुळे (Immunity Power Increase Food) आपला वेगवेगळ्या आजारापासून बचाव होतो. जर रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाली तर आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं गरजेचं आहे.
कोरोना म्हणजे पाप नाही, बहिष्कार टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार : पुणे विभागीय आयुक्त
रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्यामागे अनेक कारण आहेत. कित्येकदा आपल्या खाण्या-पिण्याच्या हलगर्णीपणामुळेही आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. तर दारु, सिगारेट यासारख्या चुकीच्या सवयीमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम जाणवतो. काही घरगुती उपायांनीही तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काही उपाय
1. ग्रीन टी किंवा ब्लॅक टी या दोन्ही गोष्टींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फार फायदेशीर आहे. पण दिवसभरात एकदा किंवा दोनदा ग्रीन किंवा ब्लॅक टी प्या. जर तुम्ही अतिप्रमाणात याचे सेवन केलात तर ते शरीरासाठी हानिकारक असते.
2. कच्चा लसून खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लसूनमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा असतात.
3. नियमित दह्याचं सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत राहण्यास मदत होते.
4. ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. त्यासोबत त्यात अँटी- माईक्राबियल गुणही असते. दररोज ओट्सचे सेवन केल्याने इम्यून सिस्टम उत्तम राहते.
Corona | औरंगाबादेत पहिला कोरोना पॉझिटिव्ह, राज्यातील रुग्णांची संख्या 32 वर
5. विटामिन डी हे आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्याला अनेक रोगांचा सामना करण्याची ताकद मिळते. त्यासोबतच आपली हाडेही मजबूत होतात. तसेच हृदयासंबंधीत अनेक आजारापासूनही तुम्ही मुक्त होऊ शकता.
6. संसर्गजन्य रोगांपासून दूर राहण्यासाठी व्हिटॅमिन सी फार महत्त्वाचे असते. लिंबू, आवळा, संत्री यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे नियमित व्हिटॅमिन सी असलेली फळं खावीत.
7. तसेच हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध याचाही आहारात नियमित समावेश ठेवावा. त्यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्त्व मिळतील आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यात मदत (Immunity Power Increase Food) होईल.