केळ्याच्या हेअर पॅकमुळे तुमच्या केसांचा सुधारतो पोत, कसे बनवावे?
केसांना केळी लावल्यास कोंडा दूर होण्यास मदत होते. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी केळीचा हेअर पॅक घेऊन आलो आहोत. केळ्याच्या हेअर पॅकमुळे तुमच्या केसांचा पोत सुधारतो. यासोबतच स्प्लिट एंडची समस्याही दूर होते.
मुंबई: केळीमध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए आणि सी सारखे गुणधर्म असतात, जे केवळ आपल्या शरीरालाच नव्हे तर केसांना देखील पोषण देतात. केसांना केळी लावल्यास कोंडा दूर होण्यास मदत होते. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी केळीचा हेअर पॅक घेऊन आलो आहोत. केळ्याच्या हेअर पॅकमुळे तुमच्या केसांचा पोत सुधारतो. यासोबतच स्प्लिट एंडची समस्याही दूर होते. इतकंच नाही तर यामुळे तुमच्या केसांच्या वाढीला चालना मिळते. तसेच यामुळे तुमचे केस मऊ आणि चमकदार होतात, तर चला जाणून घेऊया हेअर पॅक कसे बनवायचे.
हेअर पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- केळी
- कोरफड जेल
- मध २ चमचे
- नारळ तेल २ ते ३ चमचे
केळीचे हेअर पॅक कसे बनवावे?
- केळ्याचा हेअर पॅक बनवण्यासाठी आधी एक वाटी घ्या.
- मग त्यातल्या केसांच्या लांबीनुसार केळी घेऊन नीट मॅश करा.
- यानंतर तुम्ही फ्रेश कोरफड जेल काढून त्यात टाका.
- नंतर त्यात सुमारे २ ते ३ चमचे खोबरेल तेल आणि २ चमचे मध घाला.
- यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी नीट मिसळून पेस्ट तयार करा.
- आता हेअर पॅक तयार आहे.
केसांना हेअर पॅक कसा लावावा?
- केळीचे हेअर पॅक घ्या आणि ते टाळू आणि केसांच्या लांबीवर चांगले लावा.
- नंतर सुमारे 20 ते 40 मिनिटे केसांमध्ये ठेवा.
- यानंतर सर्वप्रथम नॉर्मल पाण्याने केस धुवावेत.
- त्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुवावेत.
- चांगल्या परिणामांसाठी, आपण आठवड्यातून 2 वेळा ही रेसिपी वापरुन पहा.
- याच्या सततच्या वापराने तुमचे केस मऊ आणि चमकदार होऊ लागतात.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)