पचनक्रियेला फायदेशीर असणारी नारळाच्या मलाईची खीर! कशी बनवणार? वाचा
ही क्रीमी खीर तुम्ही पटकन बनवून खाऊ शकता. तसेच चवीला ही खूप चविष्ट असते. याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया चांगली होते. तसेच तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटते, तर चला जाणून घेऊया नारळाची मलाई खीर कशी बनवावी...
मुंबई: नारळ क्रीम मध्ये फायबर आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे याचे सेवन केल्याने तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्सही कमी प्रमाणात असतात, ज्यामुळे तुमचे वजन वाढत नाही. सामान्यत: लोक नारळाच्या पाण्याचे सेवन करतात. पण क्रीम अनेकदा सोडून जातात. अशावेळी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही क्रीम खीर देखील खाऊ शकता. तर आज आम्ही तुमच्यासाठी नारळ मलाई खीर बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही क्रीमी खीर तुम्ही पटकन बनवून खाऊ शकता. तसेच चवीला ही खूप चविष्ट असते. याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया चांगली होते. तसेच तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटते, तर चला जाणून घेऊया नारळाची मलाई खीर कशी बनवावी…
नारळाची क्रीम खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- तूप १ टेबलस्पून
- दूध किंवा नारळाचे दूध २ कप
- साखर १/४ कप
- काजू २ टेबलस्पून
- बदाम २ टेबलस्पून मनुका २ टेबलस्पून
- वेलची पावडर १/४ टीस्पून
- नारळ क्रीम १/२ कप
- नारळ पाणी १/२ कप
नारळाच्या मलाईची खीर कशी बनवावी?
- नारळाच्या क्रीमची खीर बनवण्यासाठी प्रथम एका कढईत तूप घालून मध्यम आचेवर ठेवावे.
- नंतर त्यात बदाम आणि काजू घालून गोल्डन होईपर्यंत परतून घ्या.
- त्यानंतर त्यात मनुका घालून सुमारे १५ ते ३० सेकंद परतून घ्या.
- मग ते सगळं परतून घेतलेलं एका प्लेटमध्ये बाहेर काढून बाजूला ठेवा.
- यानंतर त्याच कढईत दूध टाकून उकळायला ठेवावे.
- नंतर दूध उकळून अर्धे होईपर्यंत गरम करा
- त्यानंतर त्यात साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
- नंतर गॅस बंद करा आणि मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या.
- यानंतर थंड खीरमध्ये नारळाचे क्रीम, नारळ पाणी आणि भाजलेले शेंगदाणे घाला.
- मग या सर्व गोष्टी मिसळून खीर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
- आता तुमची चवदार नारळाची मलाई खीर तयार आहे.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)