तुमचाही गुळाचा चहा फाटतो का? ‘या’ कमाल ट्रिकने बनवा फक्कड गुळाचा चहा

तुम्हीही चहाप्रेमी असाल आणि तुम्हालाही थंडीत गुळाचा चहा प्यायला आवडत असेल पण चहा फाटण्याची भिती असेल तर या खास आणि कमास टिप्स फॉलो करा तुमचा गुळाचा चहा कधीच फाटणार नाही.

तुमचाही गुळाचा चहा फाटतो का? 'या' कमाल ट्रिकने बनवा फक्कड गुळाचा चहा
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 3:08 PM

चहा म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा विषय. ‘चहा हवाय का?’ असं विचारल्यावर कदाचितच कोणी नको म्हणत असेल. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने चहा बनवतात. मग तो साखरेचा असो, विनासाखरेचा असो, लेमन टी असो, किंवा ब्लॅक टी असो, पण चहा हवाच. त्यात तर आता हिवाळा सुरु झाला आहे.

फक्कड गुळाचा चहा कसा बनवायचा?

त्यामुळे गरम कडक चहा पिण्याती तलफ सर्वांनाच येत असते. पण ज्यांना साखरेचा चहा घ्यायचा नसेल तर ते चहाप्रेमी गुळाचा चहा घेणं पसंत करतात. पण गुळाचा चहा बनवताना अडचण असते ती म्हणजे तो चहा फाटतो.

गुळाचा चहा बनवणं शक्यतो थोडं अवघड वाटू शकतं,त्यामुळे शक्यतो लोकं तो चहा करणं टाळतात. मात्र तुम्हाला माहितीये का की, गुळाचा चहा बनवण्याची एक कमाल ट्रीक आहे. ही ट्रीक जर तुम्ही वापरलीत ना तर 100 टक्के तुमचा चहा न फाटता अगदी परफेक्ट बनेल. चला जाणून घेऊयात ती कमाल ट्रीक कोणती आहे ती.

असं म्हणतात की, थंडीच्या दिवसांत गुळाच्या चहाचे सेवन तब्येतीसाठी फार फायदेशीर ठरते. काही सोपे उपाय करून चुटकीसरशी गुळाचा चहा कसा बनवायचा ते पाहू.

गुळाचा चहा बनवण्यासाठी लागणारं साहित्य

गुळाचा चहा करण्यासाठी 1 कप दूध, 1 कप पाणी, अर्धा चमचा ओवा, 1 इंच आलं, 1 छोटी वेलची, 2 तुळशीची पानं, अर्धा चमचा चहा पावडर आणि किसलेला गूळ.

कृती गुळाचा चहा करण्यासाठी सगळ्यात आधी भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात किसलेला गुळ, किसलेलं आलं, बारीक केलेली वेलची किंवा वेलची पूड, तुळशीची पानं जर तुम्हाला हवं असेल तर, आणि चहा पावडर घालून उकळवून घ्यायचं आहे. गूळ पाण्यात व्यवस्थित वितळल्यानंतर गॅस बंद करायचा.

त्यानंतर हा उखळलेला चहा एका कपमध्ये गाळून घ्यायचा आणि नंतर त्यात तुम्हाला जितकं हवं आहे तेवढं पण गरम दूध त्या गाळलेल्या कोऱ्या चहामध्ये मिक्स करायचं आहे. झाला तुमचा गुळाचा फक्कड चहा.

चहा फाटू नये यासाठी खास टिप्स

आता पाहुयात की चहा बनवताना काय चुका करायच्या नाहीयेत त्या. जेणेकरून तुमचा गुळाचा चहा न फाटता छान होईल.

1) यातील पहिली चूक म्हणजे गुळाचा चहा करताना अनेकदा लोक एकत्र सर्व साहित्य घालतात. ज्यामुळे गुळाचा चहा फाटतो.

2) खासकरून चहात गूळ आणि दूध एकत्र अजिबात घालू नये.

3) गुळाच्या चहात थंड दूधही मिक्स करणं करणं टाळा.

या टिप्स फॉलो केल्यास गुळाचा चहा कधीच फाटणार नाही.

गुळाचा चहा पिण्याचे फायदे

1) हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही दिवसांतून २ वेळा गुळाचा चहा पिऊ शकता.

2) नियमित गुळाचा चहा प्यायल्यानं इम्यूनिटी मजबूत होते.

3) शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते आणि वजन कमी करण्यासही मदत होते.

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.