आयुर्वेदिक फेसपॅक बनवा घरच्या घरीच! ‘या’ स्टेप्स फॉलो करा
या दोन प्रकारची पाने मिसळून फेसपॅक केल्यास चेहऱ्यावरील बॅक्टेरियाची वाढ थांबते आणि पिंपल्स येणे बंद होते. यासाठी मूठभर कडुनिंब आणि तुळशीची पाने आणि २-३ लवंगच्या कळ्या घेऊन त्या बारीक करून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा.
मुंबई: आजकाल अनेक महिलांना त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आपला चेहरा चमकदार असावा अशी बहुतांश मुलींची इच्छा असते, पण हे काम खूप अवघड असतं. तुळशीच्या पानापासून तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतील, असे अनेक स्किन केअर तज्ञांचे मत आहे. या पानांमध्ये तुम्हाला काही गोष्टी मिसळाव्या लागतील, तरच तुम्हाला चमकदार आणि निष्कलंक चेहरा मिळू शकेल.
1. तुळस आणि संत्र्याच्या सालीचा फेसपॅक
तुळस आणि संत्र्याच्या सालीचा फेसपॅक तयार करून लावा, ज्यामुळे मुरुमपासून मुक्ती मिळते. यासाठी तुळशीच्या पानांची पावडर आणि संत्र्याच्या सालीची पावडर मिक्स करा, आता त्यात दूध आणि मध मिसळा. फेसपॅक तयार झाल्यावर सुमारे 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि शेवटी चेहरा धुवा.
2. तुळस आणि कडुनिंबाचा फेस पॅक
तुळसप्रमाणेच कडुनिंबाच्या पानांमध्येही आयुर्वेदिक गुणधर्म असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या दोन प्रकारची पाने मिसळून फेसपॅक केल्यास चेहऱ्यावरील बॅक्टेरियाची वाढ थांबते आणि पिंपल्स येणे बंद होते. यासाठी मूठभर कडुनिंब आणि तुळशीची पाने आणि २-३ लवंगच्या कळ्या घेऊन त्या बारीक करून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. सुमारे 2 मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
3. तुळस आणि दही
तुळस आणि दही मिसळून फेसपॅक तयार केल्यास त्याचा क्लिंजिंग इफेक्ट दिसेल आणि निर्जीव त्वचेला जीवही मिळेल. धूळ, माती आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचा अनेकदा खराब होते. यासाठी तुळशीची काही पाने पूर्णपणे उन्हात वाळवावीत, या कामाला अनेक दिवस लागू शकतात. आता ही वाळलेली पाने बारीक करून पावडर तयार करा. एका बाऊलमध्ये 3 चमचे तुळशीच्या पानांची पावडर आणि एक चमचा दही मिसळा. आता हा पॅक चेहऱ्यावर लावून वाळण्यासाठी सोडा आणि शेवटी स्वच्छ पाण्याने धुवा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)