टरबूज मिल्क शेक कसे बनवावे? एकदम सोपी पद्धत!

टरबूज खाल्ल्याने तुमची पचनशक्ती आणि हाडे मजबूत राहतात. याच्या सेवनाने वजन कमी होण्यापासून प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. इतकंच नाही तर दम्याच्या रुग्णांसाठी टरबूज मिल्क शेक उत्तम आहे. टरबूज मिल्क शेक चवीला उत्तम आहे तसेच बनवायला खूप सोपे आहे.

टरबूज मिल्क शेक कसे बनवावे? एकदम सोपी पद्धत!
Watermelon milkshakeImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 5:35 PM

टरबूज हे उन्हाळ्यात मिळणारे अतिशय रसाळ फळ आहे. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. लोक सहसा सॅलड किंवा रस म्हणून टरबूजचे सेवन करणे पसंत करतात. पण तुम्ही कधी टरबूजाचे मिल्क शेक करून प्यायले आहे का? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी टरबूज मिल्क शेक बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. टरबूज खाल्ल्याने तुमची पचनशक्ती आणि हाडे मजबूत राहतात. याच्या सेवनाने वजन कमी होण्यापासून प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. इतकंच नाही तर दम्याच्या रुग्णांसाठी टरबूज मिल्क शेक उत्तम आहे. टरबूज मिल्क शेक चवीला उत्तम आहे तसेच बनवायला खूप सोपे आहे, तर चला जाणून घेऊया टरबूज मिल्कशेक कसे बनवावे.

टरबूज मिल्क शेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • टरबूजाचे तुकडे 1 कप
  • कंडेन्स्ड दूध 1/4 कप किंवा दूध 2 कप (उकळून घेतलेले आणि थंड)
  • पाणी 1.5 कप (फक्त कंडेन्स्ड दूध वापरल्यावरच घेणे)
  • व्हॅनिला अर्क 1/2 (ऐच्छिक)
  • आवडते आईस्क्रीम
  • बर्फाचे तुकडे चवीला किंचित
  • साखर चवीनुसार

टरबूज मिल्क शेक कसे बनवावे?

  • टरबूज मिल्क शेक बनविण्यासाठी, प्रथम टरबूज घ्या.
  • नंतर त्याचे तुकडे करून बाजूला ठेवा.
  • यानंतर कंडेन्स्ड मिल्क आणि टरबूजचे तुकडे थंड करण्यासाठी ठेवा.
  • नंतर मिक्सर जारमध्ये थंड टरबूजाचे तुकडे, कंडेन्स्ड मिल्क, पाणी आणि व्हॅनिला अर्क (ऑप्शनल) घाला.
  • यानंतर या सर्व गोष्टी नीट बारीक करून शेक तयार करून घ्या.
  • आता तुमचा स्वादिष्ट आणि थंड-थंड टरबूज मिल्क शेक तयार आहे.
  • नंतर सर्व्हिंग ग्लासमध्ये ठेवून आईस्क्रीमने सजवून थंड सर्व्ह करा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.