ऑनलाईन शॉपिंग करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

केवळ महानगरांमध्येच नव्हे, तर शहरांमध्येही ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. पण तुम्हाला माहित आहे का ऑनलाईन शॉपिंगच्या नादात अनेक जण फसवणुकीला बळी पडत आहेत.

ऑनलाईन शॉपिंग करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 4:11 PM

ऑनलाइन शॉपिंगमुळे लोकांना खूप चांगला पर्याय मिळाला. त्यामुळे अनेकजण खरेदीसाठी बाहेर जाण्याचे टाळतात. घरबसल्या तुमच्या सोयीनुसार ऑनलाइन शॉपिंग करता येते. ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला वेळेचे बंधन नसते. त्यामुळे तुम्ही रात्रीचे १२ वाजले तरी शॉपिंग करू शकता. रेशन, कपड्यांपासून ते जेवण मागवण्यापर्यंत लोकं ऑनलाइन ऑर्डर करण्याला अधिक पसंती देत आहेत, अशा परिस्थितीत आज तुम्ही घरबसल्या आपल्या फोनच्या मदतीने सर्व कामे ऑनलाइन करू शकता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

‘या’ कारणांमुळे वाढत आहे ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड

पूर्वी लोक ऑनलाइन शॉपिंग करण्यास थोडे संकोच करत असायचे. पण आताच्या घडीला ऑनलाईन शॉपिंग करताना सहज परतावा आणि जलद डिलिव्हरी यामुळे गेल्या काही वर्षांत त्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. दीडशे रुपयांची एखादी वस्तू तुम्ही ऑनलाइन देखील घरी मागवू शकता, नाहीतर बाहेर जाण्यासाठी इतके पैसे ऑटो किंवा पेट्रोलवर खर्च होतात. म्हणजेच ऑनलाइन शॉपिंग केल्याने केवळ पैसाच नाही तर तुमचा वेळही वाचतो. त्यामुळे केवळ महानगरांमध्येच नव्हे, तर गावांमध्ये व शहरांमध्येही ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.

पण तुम्हाला माहित आहे का या वाढत्या ऑनलाईन शॉपिंगच्या नादात अनेक जण फसवणुकीला बळी पडत आहेत. तुम्हीसुद्धा या फसवणुकीला बळी पडू नये म्हणून ऑनलाइन शॉपिंग करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

हे सुद्धा वाचा

वेबसाईट खरी आहे की खोटी?

ऑनलाईन शॉपिंग करताना सर्वप्रथम तुम्ही ज्या साईट किंवा ॲपवरून शॉपिंग करत आहात ती साईट किंवा ॲप खरी आहे की बनावट हे लक्षात घ्यायला हवं. कारण फसवणूक करणारे अनेकदा लोकांना फसवण्यासाठी रिअल ॲप्स किंवा वेबसाइटकॉपी करतात. जे बारकाईने पाहिले नाही तर खऱ्या संकेतस्थळासारखे दिसते.

ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही ज्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन वस्तू पाहता तेव्हा तुम्ही स्वतः एक खबरदारी घेतली पाहिजे की,वेबसाइट किंवा ॲप खरे आहे की बनावट हे तपासून पाहणे. नाहीतर तुम्ही वस्तूची ऑर्डर देऊन ऑनलाईन पद्धतीने पैसे सेंड कराल. आणि अश्याने तुमची वस्तू ही मिळणार नाही आणि त्यासोबत पैसे देखील परत मिळणार नाही. जर आपण एखाद्या साइटची सत्यता तपासू इच्छित असाल तर खात्री करा की साइट नेहमीच https पासून सुरू होते आणि .in आणि .com सह संपते. हे लक्षात ठेवा की बनावट साइटवर ऑर्डरसाठी पैसे दिल्यास तुमची वैयक्तिक माहिती देखील फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकते.

वेबसाइटवर कधीही तुमचे पेमेंट डिटेल्स सेव करून ठेऊ नका

क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी करताना वारंवार तपशील प्रविष्ट करणे टाळण्यासाठी बहुतेक लोक वेबसाइटवर त्यांचे पेमेंट डिटेल्स सेव करतात. जेणेकरून पुढच्या वेळी खरेदी करताना त्यांचा वेळ वाचेल. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा थोडा वेळ वाचविण्यासाठी मोठी जोखीम घेत आहात. अश्याने फसवणूक करणाऱ्याला तुमची संपूर्ण बँक खात्यातील माहिती मिळाल्याने तुमच्या बँक अकाउंट हॅक करून पैसे काढले जाऊ शकतात. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना या गोष्टींचा विचार करून तुम्ही शॉपिंग करू शकता.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.