बुटांचा दुर्गंध दूर करण्यासाठी 5 hacks!
आपण शूज घेतो खरं पण बरेचदा ते घालणं टाळतो सुद्धा कारण शूजचा वास येतो. पावसाळा असेल तर शूज ओले झाल्यामुळे वास येतो, उन्हाळ्यात घामामुळे वास येतो अशा वेगवेगळ्या कारणांनी शूजचा वास येत असतो. मग यावर काय उपाय आहे? आम्ही आज तुम्हाला 5 सोपे उपाय सांगणार आहोत ज्याने शूजला येणारा वास जाऊ शकतो. चला बघुयात काय उपाय आहेत...
मुंबई: शूज सगळ्यांना आवडतात. वेगवेगळे शूज घेणं जणू लोकांचा छंदच! किती तरी ब्रँडचे शूज आज मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. कितीही महाग असतील तरीही शूज विकत घेतले जातात. एखाद्या कार्यक्रमात, ऑफिसमध्ये शूज घालून गेलं की वेगळंच इम्प्रेशन पडतं. मोठमोठ्या लोकांचं तर असं मत आहे की शूज तुमचं व्यक्तिमत्त्व सांगतात त्यामुळे शूज घेताना काळजी घ्यावी. आपण शूज घेतो खरं पण बरेचदा ते घालणं टाळतो सुद्धा कारण शूजचा वास येतो. पावसाळा असेल तर शूज ओले झाल्यामुळे वास येतो, उन्हाळ्यात घामामुळे वास येतो अशा वेगवेगळ्या कारणांनी शूजचा वास येत असतो. मग यावर काय उपाय आहे? आम्ही आज तुम्हाला 5 सोपे उपाय सांगणार आहोत ज्याने शूजला येणारा वास जाऊ शकतो. चला बघुयात काय उपाय आहेत…
ब्लॅक टी बॅग: ब्लॅक टीमध्ये टॅनिन असते, जे आपल्या शूजमध्ये तयार होणारे बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम करेल आणि दुर्गंधी दूर करण्यास मदत करेल. ब्लॅक टी उकळत्या पाण्यात दोन ते तीन मिनिटे ठेवा. ब्लॅक टी बॅग काढा आणि ते पाणी थंड होऊ द्या. आता हे पाणी एक ते दोन तास शूज मध्ये ठेवा. एक तासाने शूज धुवून टाका, शूजला येणार वास निघून जाईल.
मीठ: स्नीकर्स आणि इतर कॅनव्हास शूज यांना खूप दुर्गंधी येऊ शकते, विशेषत: जर आपण उन्हाळ्यात मोजे न घालता शूज घातले तर शूजला खूप दुर्गंधी येते. आपल्या कॅनव्हास शूजमध्ये थोडे मिठाचे पाणी शिंपडून दुर्गंधी दूर करा.
इसेन्शिअल ऑइल: इसेन्शिअल ऑइल खास सुंगंधासाठी वापरले जातात. आपल्या बूटमध्ये इसेन्शिअल ऑइलचे काही थेंब शिंपडा जेणेकरून त्याला सुगंध येईल. निलगिरी, लवंग किंवा चहाच्या झाडाचे तेल वापरण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर डायरेक्ट शूजवर तेल शिंपडायचं नसेल तर ते कागदाच्या तुकड्यावर किंवा टिश्यूवर घ्या आणि तो पेपर रात्रभर आपल्या बूटमध्ये ठेवा.
अल्कोहोल: दुर्गंधी कमी होण्यास मदत करण्यासाठी आपल्या शूजच्या घाणेरड्या किंवा जीर्ण भागावर अल्कोहोल चोळा. अल्कोहोल बुटाला चोळल्यास फक्त सुंगंध येत नाही तर त्याच निर्जंतुकीकरण देखील होतं. करून बघा!
बेबी पावडर: बेबी पावडर वापरणे हा खूप चांगला ऑप्शन आहे. बूट घालण्या आधी तुम्ही पायाला ही पावडर चोळू शकता. हा खूप चांगला पर्याय आहे. बेबी पावडर अजिबात घातक नसते याने आपल्या बुटांचे देखील नुकसान होत नाही.