डार्क सर्कल्सवर उपाय काय? वाचा
आज आम्ही तुमच्यासाठी बदाम ऑईल आय मास्क घेऊन आलो आहोत. बदाम ऑईल आय मास्क ट्राय करून तुम्ही डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवू शकता. याशिवाय फुगलेल्या आणि थकलेल्या डोळ्याच्या समस्येवरही तुम्ही मात करू शकता.
डोळे ही माणसाची ओळख आहे. त्यामुळे आकर्षक डोळे मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या असते, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या सौंदर्याला ग्रहण लागतं. आज आम्ही तुमच्यासाठी बदाम ऑईल आय मास्क घेऊन आलो आहोत. बदाम ऑईल आय मास्क ट्राय करून तुम्ही डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवू शकता. याशिवाय फुगलेल्या आणि थकलेल्या डोळ्याच्या समस्येवरही तुम्ही मात करू शकता, तर चला जाणून घेऊया बदाम ऑइल आय मास्क कसा बनवावा आणि वापरावा.
बदाम तेलाचा मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- बदाम तेल 1 टीस्पून
- लिंबाचा रस 1/2 टीस्पून
बदाम तेलाचा आय मास्क कसा बनवावा?
- बदाम तेलाचाआय मास्क तयार करण्यासाठी, प्रथम एक छोटी वाटी घ्या.
- नंतर त्यात एक चमचा बदाम तेल आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घाला.
- त्यानंतर हे दोन्ही नीट मिक्स करून गुळगुळीत मिश्रण तयार करावे.
- आता तुमचा बदाम ऑईल आय मास्क तयार आहे.
बदाम तेल आय मास्क कसा वापरावा?
- बदाम ऑईल आय मास्क लावण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ करा.
- त्यानंतर तयार केलेले मिश्रण डोळ्याखाली चांगले लावा.
- यानंतर थोडा वेळ ते तसेच सोडून द्या.
- त्यानंतर कॉटन पॅड किंवा साध्या पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करावा.
- चांगल्या परिणामांसाठी, आपण आठवड्यातून 2 वेळा हा आय मास्क वापरुन पहावा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)