केसांसाठी अंड्याचा वापर कसा करावा?
जर तुम्हाला तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवायचे असतील तर तुम्ही अंड्यांचा वापर करू शकता. केसांमध्ये अंड्यांचा वापर कसा करावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुंबई: लांब, काळे केस सर्वांनाच आवडतात. ज्यामुळे लोक केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अजमावतात. पण हल्ली ऊन आणि धुळीमुळे केस खराब होतात. यामुळे केस कोरडे होतात. अशावेळी जर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव असतील तर अंड्याने तुम्हाला मदत होऊ शकते. जर तुम्हाला तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवायचे असतील तर तुम्ही अंड्यांचा वापर करू शकता. केसांमध्ये अंड्यांचा वापर कसा करावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
केसांमध्ये अंडी कशी वापरावीत
तसं तर अंड्याचे दोन्ही भाग केसांसाठी चांगले असतात. दुसरीकडे जर तुमचे केस तेलकट असतील तर अंड्याचा पांढरा भाग केसांमध्ये लावा, पण जर तुमचे केस कोरडे असतील तर पिवळा भाग लावा.
अंडी आणि दही
केसांची प्रत्येक समस्या दूर करण्याचे काम अंडे करते. अशावेळी जर तुमचे केस कोरडे असतील तर तुम्ही केसांमध्ये दही आणि खोबरेल तेल लावा. हा पॅक टाळूवर लावा आणि केसांमध्ये 20 मिनिटे ठेवा. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावा. असे केल्याने केस चमकदार आणि सुंदर होतील.
अंडी आणि मध
केसांची चमक वाढवण्यासाठी तुम्ही अंडी आणि मधदेखील वापरू शकता. ते वापरण्यासाठी एका भांड्यात दोन अंडी अर्धा कप मध मिसळा. आता नीट फेटून घ्या. हा मास्क आपल्या मुळांवर आणि संपूर्ण केसांवर लावा. आणि 30 मिनिटे ठेवा. आता आपले केस हलक्या हाताने धुवा.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)