निर्दोष आणि चमकदार त्वचा हवी? बटाटे या 3 मार्गाने वापरून पहा
चेहऱ्यावर बटाट्याचा योग्य वापर केल्याने तुमचे डाग हलके होऊ लागतात. त्याचबरोबर बटाट्यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म देखील असतात, त्यामुळे आपल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास देखील हे उपयुक्त आहे. इतकंच नाही तर आपल्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं आणि फुगवटा दूर करण्यासाठी बटाटे उपयुक्त ठरतात, तर चला तर मग जाणून घेऊया चमकदार त्वचेसाठी बटाट्याचे फेसपॅक कसे बनवावे.
मुंबई: बटाटा ही अशी भाजी आहे जिला सगळीकडून चांगलीच पसंती मिळते. त्यामुळे बटाट्याचा आहारात अनेक प्रकारे समावेश केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की बटाटे आपल्या त्वचेला बरेच फायदे देऊ शकतात. नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी चमकदार त्वचेसाठी बटाट्याचे फेसपॅक घेऊन आलो आहोत. चेहऱ्यावर बटाट्याचा योग्य वापर केल्याने तुमचे डाग हलके होऊ लागतात. त्याचबरोबर बटाट्यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म देखील असतात, त्यामुळे आपल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास देखील हे उपयुक्त आहे. इतकंच नाही तर आपल्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं आणि फुगवटा दूर करण्यासाठी बटाटे उपयुक्त ठरतात, तर चला तर मग जाणून घेऊया चमकदार त्वचेसाठी बटाट्याचे फेसपॅक कसे बनवावे.
एका भांड्यात 2 चमचे मुलतानी माती आणि बटाट्याचा रस काढून ठेवावा. नंतर ते मिक्स करून चेहऱ्यावर सुमारे 15 मिनिटे लावा. हा फेसपॅक चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून डाग कमी करण्यास मदत करतो.
एका भांड्यात 1 चमचा टोमॅटोचा रस, 2 चमचे मध आणि 1 चमचा बटाट्याचा रस मिसळावा. नंतर ते चेहऱ्यावर चांगले लावा आणि 1 मिनिटे ठेवा. या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेची छिद्रे साफ होतात, ज्यामुळे मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळतो.
एका भांड्यात 1 चमचा बटाट्याचा रस, 1 चमचा मध आणि 2 चमचे कच्चे दूध मिसळावे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात ग्लिसरीनचे काही थेंब देखील घालू शकता. नंतर थोडा वेळाने चेहरा धुवून टाका. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून 1 वेळा लावू शकता. यामुळे तुमचा चेहरा खोलवर स्वच्छ होतो, ज्यामुळे तुमचा चेहरा सुधारतो.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)