गरोदर मातेला कोरोना झाल्यास अशी घ्या काळजी, वाचा सविस्तर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनाचा संसर्ग हा दिवसेंदिवस संपूर्ण देशात वाढतच चालेला आहे.
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनाचा संसर्ग हा दिवसेंदिवस संपूर्ण देशात वाढतच चालेला आहे. यामध्ये अनेक गरोदर महिलांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर गरोदर महिलांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. जर तुमची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल तर कोणत्याही निरोगी व्यक्तीप्रमाणे तुम्हाला कोणताही गंभीर आजार होणार नाही. (If a pregnant mother is infected with corona, care should be taken in this way)
गरोदर मातेला कोरोना झाल्यास विशेष काळजी ही घेतली गेली पाहिजे. गरोदर मातेने डा्ॅक्टरांच्या सल्लानुसार आहार घेतला पाहिजे. कोरोना बरा होतो म्हणून अनेकजण कोरोनाच्या काळात गरम पाणी पिण्यावर अधिक भर देतात. मात्र, शक्यतो गरोदर मातेने या काळात गरम पाणी पिणे धोकादायक आहे. कोरोनावर मात करण्यासाठी व्हिटामिन सी हे फायदेशीर असते. मात्र, गरोदर मातेने व्हिटामिन सी जास्त प्रमाणात आहारात घेण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
नियमित व्यायाम करून, प्राणायाम देखील करावा. प्राणायाम केल्याने हवामान बदलल्यामुळे गरोदर मातेला फ्रेश झाल्यासारखे वाटेल. मात्र, व्यायाम करताना काही त्रास वगैरे होत असले तर आपण डाॅक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. एक लक्षात घ्या की, कोरोना व्हायरस हा एक नवीन विषाणू आहे. त्यामुळे त्याच्याविषयीची पुरेशी माहिती आपल्याला अद्याप नाही. कोरोनामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते किंवा गर्भधारणेत अडथळा निर्माण होतो, याविषयी आपल्याकडे कोणताही वैद्यकीय पुरावा नाही.
धोका कमी कसा करता येईल?
कोरोना विषाणूची लागण झाल्याची लक्षणं दिसत असलेल्या व्यक्तीशी संपर्क टाळा.
नियमित हात धुवा.
अन्न योग्य पद्धतीने शिजवून खा. आरोग्यदायी, जीवनसत्वयुक्त पदार्थच खा.
तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कुणीही खोकताना तसंच शिंकताना टिश्यू पेपरचा वापर करा. वापर झाल्यावर हा टिश्यू पेपर कचऱ्याच्या डब्यात टाका आणि हात स्वच्छ धुवा.
बाहेर जाणं टाळा. घरीच थांबा.
फोन किंवा ऑनलाईन माध्यमातून तुमच्या डाक्टरांच्या संपर्कात राहा.
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(If a pregnant mother is infected with corona, care should be taken in this way)