रोज अंडी खाता का ? जाणून घ्या अंडं उकडण्याची योग्य पद्धत
आपल्या नाष्टांमध्ये आणि डायट मध्ये अनेकजण अंड्याचा समावेश करतात. पण केवळ अंडे खाणे चांगल्या आरोग्यासाठी पुरेसे नसून तर ते योग्य प्रकारे खाणे देखील तितकेच महत्वाचे आहे. जाणून घेऊ अंडे उकडण्याची योग्य पद्धत.
आपण सर्वजण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की अंडं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे विशेषतः उकडलेले अंडे. पण हे अंडं उकडण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याचदा आपण हे विसरतो की केवळ अंड खाणे चांगल्या आरोग्यासाठी पुरेसे नसून तर ते योग्य प्रकारे खाणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जेणेकरून आपण अंड्याद्वारे प्रदान केलेल्या सर्व पोषक तत्वांचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो.
अंडे किती वेळ उकडले पाहिजे ?
अंडे उकडण्याची वेळ त्याच्या पिकण्याच्या अवस्थेवर अवलंबून असते. साधारणपणे कोणतेही अंडे पंधरा मिनिटे उकडणे पुरेस असते. जर तुम्हाला अंडे फक्त अर्धे उकडलेले हवे असेल तर पंधरा मिनिटे उकडल्यानंतर लगेच थंड पाण्यात टाका. त्यामुळे अंड्यातील पिवळा बलक मऊ राहील त्याचवेळी जर तुम्हाला अंडे पूर्णपणे उकडायचे असेल तर ते पंधरा मिनिटांपेक्षा तीन ते पाच मिनिटे जास्त उकडू द्या.
अंडी उकडण्यापुर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सर्वप्रथम अंडे उकडण्यासाठी पाणी गरम करा त्यामुळे अंड्याच्या आतील भाग हिरवा होणार नाही तसेच अंडे उकडल्यानंतर ते थंड पाण्यात टाका याने अंड्याचे कवच सहज काढले जाईल.
हिवाळ्यात अंडे ठरेल फायदेशीर
प्रथिनांचा चांगला स्त्रोत
अंडे हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. जो स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी मदत करतो.
व्हिटॅमिन आणि पोषक तत्वे
अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के तसेच झिंक आणि सेलेनियम यासारखे पोषक घटक असतात. जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
हाडे मजबूत करते
अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी असते जे कॅल्शियम शोषण्यास मदत करते आणि हाडे मजबूत करते.
डोळ्यांसाठी फायदेशीर
अंड्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात. जे डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
अंडे प्रोटीनच्या बाबतीतही खूप चांगले असतात. जे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरलेले ठेवतात आणि यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
सर्दी आणि खोकल्यावर गुणकारी
अंड्यामध्ये असलेले झिंक तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. सर्दी आणि खोकला प्रतिबंधित करते.