विसरभोळे झालात तर या व्हिटॅमिनची असू शकते कमतरता, आहारात या गोष्टींचा करा समावेश
वय वाढल्यानंतर स्मृतीभ्रंश होणे हे सामान्य आहे, परंतु जर कमी वयात देखील ही समस्या जाणवत असेल तर तुमच्या शरीरात काही गोष्टींची कमतरता असू शकते. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे घडू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात कोणते पदार्थ खावे लागतील. जाणून घ्या.
आपल्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए, बी, सी आणि डी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन बी 12 देखील खूप महत्वाचे आहे. ते जर शरीरात पुरेशा प्रमाणात नसेल तर वेगवेगळ्या समस्या तुम्हाला जाणवू शकतात. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, व्हिटॅमिन बी 12 हे एक आवश्यक पोषक तत्व आहे. तुम्ही जर वारंवार एखादी गोष्ट विसरत असाल तर त्यामागे व्हिटॅमिन बी12 ची कमतरता हे कारण असू शकतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात त्याचा समावेश केला पाहिजे.
तुम्ही व्हिटॅमिन बी 12 साठी आवश्यक असलेले अन्न घेत नसाल तर यामुळे तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागू शकतो. एचआयव्ही सारख्या धोकादायक आजारामुळे व्हिटॅमिन बी 12 शरीरात शोषले जात नाही. त्याचप्रमाणे काही वाईट जीवाणू, प्रतिजैविक, शस्त्रक्रिया आणि टेपवर्म देखील या जीवनसत्वाच्या कमतरतेचे कारण असू शकते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे
– चक्कर येणे – भूक न लागणे – त्वचा पिवळी किंवा निस्तेज होणे – वारंवार मूड बदलणे – तणाव वाढणे – खूप थकवा जाणवणे -हाता-पायांमध्ये मुंग्या येणे – हृदयाचे ठोके वाढणे – स्नायू कमकुवत होणे
व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे होणारे आजार
-विस्मरणाची समस्या – हाडे दुखण्याची समस्या – मज्जासंस्थेवर परिणाम – शरीराच्या अवयवापर्यंत रक्त पोहोचवण्यात अडचण
व्हिटॅमिन बी-12 आरोग्यासाठी महत्त्वाचे का
गरोदरपणात महिलांना व्हिटॅमिन बी-12 ची खूप गरज असते. व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो. यामुळे हाडे आणि सांधे दुखतात. याशिवाय ॲनिमियाचा धोका देखील वाढतो. शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे.
जर तुम्हालाही बी १२ व्हिटॅमिनची कमतरता जाणवत असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करावे लागतील. जसे की, चीज, ओट्स, दूध ब्रोकोली, मशरूम, मासे, अंडी, सोयाबीन, दही