नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शोधत आहात शांत ठिकाणं? तर भारतातील ही ठिकाणं आहेत BEST
आता काही दिवसातच नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करतात. पण असे काही लोक असतात ज्यांना शांततेच्या ठिकाणी जायला आवडते. जर तुम्हालाही शांत ठिकाणी जायला आवडत असेल तर जाणून घ्या कमी गर्दीच्या पाच ठिकाणांबद्दल ज्या ठिकाणी तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जाऊ शकता.
आता काहीच दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण तयारी करत आहे. कोणी घरीच पार्टीचे आयोजन करत आहे तर कोणी बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करत आहे. येणारे नवीन वर्ष नवा उत्साह आणि नवीन अपेक्षा घेऊन येत असते. हा दिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो. नवीन वर्षाचा पहिला दिवस अनेक जण कुटुंब आणि मित्रांसह साजरे करतात. काही लोक नवीन वर्षाच्या निमित्ताने मोठी पार्टी करतात तर काहींना नवीन वर्षाचा पहिला दिवस एकांतात साजरा करायचा असतो. तुम्हाला नवीन वर्षाचा पहिला दिवस शांत वातावरणात साजरा करायचा असेल तर जाणून घेऊ अशाच काही शांत ठिकाणांबद्दल.
भारतामध्ये अशे अनेक ठिकाण आहे जी त्यांच्या शांत आणि आरामदायी वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. इतर ठिकाणांच्या तुलनेमध्ये या ठिकाणांवर गर्दी कमी असते. निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेली ही ठिकाणे तुम्हाला नक्कीच प्रेमात पडतील. जाणून घेऊया कोणती आहे ती ठिकाणे जिथे तुम्हाला शांतते सोबतच आनंद देखील मिळेल.
मलनाड, कर्नाटक
कर्नाटक मधील मलनाड अतिशय शांत ठिकाण आहे. मलनाड येथील धबधबे आणि हिरवेगार टेकड्यांचे सुंदर दृश्य पाहून तुम्ही नक्कीच मोहात पडाल. या ठिकाणी लोकांची गर्दी नसते. मलनाड येथे तुम्ही कुमार स्वामी हिल्स, अक्सा धबधबा आणि हगडी जंगलांना भेट देऊ शकता.
गंगटोक, सिक्किम
गंगटोक सिक्कीमची राजधानी आहे. गंगटोक हे एक हिल स्टेशन आहे पण हिल स्टेशनच्या तुलनेत इथे गर्दी फार कमी असते. गंगटोक त्याची तिबेटी संस्कृती आणि शांत वातावरणामुळे उत्तम पर्यटन स्थळ आहे. नाथू ला पास आणि चांगू तलाव यासारख्या ठिकाणी तुम्ही नवीन वर्ष साजरे करू शकता.
झिरो व्हॅली, अरुणाचल प्रदेश
झिरो व्हॅली अतिशय सुंदर आहे. झिरो व्हॅली येथे तुम्हाला शांततेत वेळ घालवण्याची संधी मिळेल. येथे गर्दी कमी असते त्यामुळे निसर्गप्रेमी आणि शांतता हवी असणाऱ्यांसाठी ही जागा एकदम योग्य आहे. झिरो व्हॅली येथे तुम्ही पक्षी निरीक्षण, सांस्कृतिक अनुभव आणि ट्रेकिंग करू शकतात.
वायनाड, केरळ
केरळ मध्ये असलेले वायनाड हे ठिकाण अतिशय सुंदर आणि अज्ञात ठिकाण आहे. हे ठिकाण अज्ञात असल्यामुळे इथे फारसे पर्यटक येत नाहीत. वायनाड हे हिरवेगार तलाव आणि चहांच्या बागांसाठी ओळखले जाते. नवीन वर्षात फिरायला जाण्यासाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन ठरेल.
कुमाऊँ प्रदेश, उत्तराखंड
उत्तराखंड मधील कुमाऊँ प्रदेश नैनीताल आणि मसुरी सारख्या गर्दीच्या ठिकाणांपासून दूर आहे. नासनी, अल्मोडा आणि बिनसार सारखी ठिकाणे त्यांच्या शांतता आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्ही नदीकाठावर बसणे, पक्षी निरीक्षण आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.