मुळव्याधचा त्रास होतोय तर आहारात करा याचा समावेश, लगेचच मिळेल आराम
Piles : ऑफिसमध्ये बसून काम करावे लागत असल्यामुळे अनेकांना मुळव्याध होण्याचं प्रमाण वाढले आहे. मुळव्याध झाल्यानंतर ते वाढू नये म्हणून आधीच उपाय केले पाहिजे. मुळव्याध झालेल्या लोकांना खूपच वेदना सहन कराव्या लागतात, शोचालयात गेल्यावरही वेदन असाह्य होतात. अशा लोकांनी आपल्या आहारात एका गोष्टीचा समावेश केला पाहिजे.
मुंबई : मूळव्याधची समस्या आता सामान्य आजारा सारखी झाली आहे. बैठ्या कामाच्या पद्धतीमुळे मुळव्याध होण्याचं प्रमाण वाढत आहे. या आजारामुळे अनेकांना उठताना आणि बसताना देखील खूप त्रास होतो. आधी ४५ च्या नंतरच्या वयातील लोकांमध्ये हा आजार आढळून येत होता. पण आता तरुणपणातही मुळव्याध होण्याचं प्रमाण वाढले आहे. मुळव्याधमुळे वेदना आणि जळजळ तर होतेच पण नंतर रक्तस्त्रावही सुरू होतो. मूळव्याधचे दोन प्रकार आहेत, एक रक्तपडणारे मूळव्याध आणि दुसरा मृत मूळव्याध. रक्तरंजित मूळव्याधची समस्या अनेकांना दिसून येते. मूळव्याध मध्ये उद्भवणारे चामखीळ सर्वात वेदनादायक असतात. अशा परिस्थितीत मूळव्याध दूर करण्यासाठी जर तुम्ही तुमच्या आहारात सुरण भाजीचा वापर केला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल.
सुरणची भाजी फायदेशीर
मूळव्याध असलेल्या लोकांनी सुरणचे सेवन सुरु करावे. मुळव्याधमध्ये ते खूपच फायदेशीर ठरते. सुरणमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि बीटा कॅरोटीन असते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. सुरणमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कमी तेल वापरुन बनवलेले सुरण पचायला देखील हलके असते. त्यामुळे जर मुळव्याधचा त्रास असेल तर सुरणचा आहारात समावेश करावा.
कोणत्या आजारांवर सुरण गुणकारी
मूळव्याध व्यतिरिक्त कॅन्सरसारख्या आजारात देखील सुरणाची भाजी खूप फायदेशीर आहे. सुरणमुळे पचनक्रिया सुधारते आणि मजबूत होते.
सुरणाच्या भाजीसोबत ताक पिल्याने देखील फायदा होतो. सुरणाचे तुकडे वाफवून घ्या आणि नंतर तिळाच्या तेलात भाजी करु शकता.साधारण महिनाभर दर दुसर्या दिवशी खा आणि त्यावर ताक प्या. यामुळे मूळव्याध हळूहळू कमी होईल.
सुरण कसे बनवावे : सुरण सर्वात आधी चांगले उकळून घ्यावे. उकळताना पाण्यात थोडी तुरटी घालावी. त्यात थोडासा कोकम घालावा. अन्यथा ते तुमचा गळा खवखव करेल.