आग्रा गेल्यावर ‘या’ पदार्थांचा आस्वाद घ्यायलाच हवा; शास्त्र असतं ते!

जगभरात ताजमहलमुळे आग्रा (Agra) नावारुपाला आले आहे. अनेक पर्यटक केवळ ताजमहल पाहण्यासाठी आग्रा जात असतात. परंतु यासोबतच तुम्ही कधी आग्रा गेलात तर तेथील स्ट्रीट फूड्‌स नक्की ट्राय करा. आग्राचा पेठा व त्याची मिठाईच्या व्यतिरिक्त अन्य विविध स्ट्रीट फूड तुमच्या जिभेला तृप्त केल्याशिवाय राहणार नाही.

आग्रा गेल्यावर ‘या’ पदार्थांचा आस्वाद घ्यायलाच हवा; शास्त्र असतं ते!
आग्रा गेल्यावर ‘या’ पदार्थांचा आस्वाद घ्यायलाच हवाImage Credit source: file photo
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 12:01 PM

आग्रा (Agra) शहराचे नाव जरी काढले तरी डोळ्यासमोर क्षणाचाही विलंब न होता ताजमहलाचे चित्र समोर येते. आग्रा अन्‌ ताजमहल हे एक घट्ट नाते आहे. ताजमहल (Taj Mahal) हे जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो पर्यटक ताजमहल पाहण्यासाठी आग्रा जात असता. यात, विदेशी पर्यटकांची संख्या मोठी असते. परंतु याशिवाय आग्रा स्ट्रीट फूडसाठीही (street foods) प्रसिध्द ठिकाण आहे. जर तुम्ही आग्रा जाण्याच्या विचारात असाल तर या लेखात आम्ही तेथील काही स्ट्रीट फूड्‌सची माहिती तुमच्यासाठी घेउन आलो आहोत. आग्रा गेल्यानंतर तुम्ही याचा मनसोक्त आनंद घेउ शकतात.

पेठा

जर तुम्ही या सुट्यांमध्ये आग्रा जाण्याच्या विचारात असाल तर त्याठिकाणी गेल्यावर तुम्ही पेठ्याच्या मिठाईचा नक्की आस्वाद घ्यायला हवा. आग्र्यातील पेठ्याची मिठाई खूप प्रसिध्द आहे. ही मिठाई विविध प्रकारात बनवलेली असते. यात केशरपासून ते पानापर्यंत अनेक प्रकार असतात.

भल्ला

आग्र्यातील स्ट्रीट फूड्‌सचा विचार केल्यास भल्ला हा सर्वाधिक प्रसिध्द पदार्थ आहे. हा खूपच चवदार असल्याने लोकांच्या पसंतीला उतरत असतो. मस्त सायंकाळी शहराचा फेरफटका मारताना कुठल्याही चौकात तूम्ही भल्ल्याचा आनंद घेउ शकतात. बटाट्याच्या टिक्कीच्या स्वरूपात, गोड किंवा मसालेदार चटणीसह भल्ला खाता येतो. किंवा हरभर्यांच्या भाजीसोबतही भल्ला खायला घालतात.

आग्रा बेदाई

हा आग्र्यातील एक प्रसिध्द नाश्‍त्याचा प्रकार आहे. हा एकप्रकारे कचोरीसारखा प्रकार असतो. यात मसालेदार बटाट्याच्या सार देउन खवय्यांना खायला दिले जात असते. यात गोड किंवा तिखट अशा दोन्ही प्रकारांचा आस्वाद घेतला जाउ शकतो. अनेक ठिकाणी याला दह्यासोबतही खायला दिले जात असते.

दालमोठ

तुम्ही भूक लागल्यावर हा हलका फूलका पदार्थ खाउ शकतात. याला मसाले आणि तळलेल्या दाळींपासून बनविले जात असते. जर तुम्हाला तिखट आणि मसालेदार पदार्थ खायला आवडते तर हा पदार्थ तुम्हाला अगदी फीट बसेल. यासोबत तुम्ही विविध पेयदेखील घेउ शकतात.

जिलेबी

आग्रा हे जिलेबीसाठीही प्रसिध्द आहे. तुम्ही आग्रा गेल्यावर गरमागरम जिलेबीचाही आस्वाद घेउ शकतात. ही जिलेबी तुम्ही दह्यासोबतही खाउ शकतात.

शौरमा

आग्र्यातील शौरमादेखील खूप प्रसिध्द आहे. चिकनने भरलेला रोल हिरव्या चटनीसोबत खायला दिला जातो. हे खूप चवदार लागत असते. मेयोनेजसोबत हा रोल अजूनच चविष्ट बनवण्यात येत असतो. त्यामुळे खवय्यांकडून याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

हेही वाचा:

Health Care : उन्हाळ्याच्या हंगामामध्ये अति थंड पाण्याचे सेवन करणे टाळाच, वाचा महत्वाचे!

Health Tips : दह्याबरोबर मध खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.