दूध आणि दही खाण्याचा कंटाळा आला असेल तर, करा या पदार्थांचे सेवन

दही आणि दुधामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. पण दूध आणि दही खाऊन अनेक वेळा कंटाळा येतो. शरीरात कॅल्शियम वाढवण्यासाठी दूध आणि दह्याव्यतिरिक्त आणखीनही काही पदार्थ आहे ज्यामुळे शरीरातील कॅल्शियम वाढते.

दूध आणि दही खाण्याचा कंटाळा आला असेल तर, करा या पदार्थांचे सेवन
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 3:39 PM

आपल्या सर्वांना माहिती आहे की दूध आणि दही हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहेत. जे आपली हाडे आणि स्नायू निरोगी आणि मजबूत ठेवतात. जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता येते. तेव्हा सर्वात आधी दूध आणि दह्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु दररोज दूध आणि दही खाऊन अनेक वेळा कंटाळा येतो. जाणून घेऊया काही पौष्टिक पदार्थांबद्दल जे कॅल्शियम पुरवण्यासोबतच तुमची एनर्जी लेवल वाढवण्यास मदत करतील आणि दूध आणि दह्या पेक्षा जास्त फायदेशीर ठरतील.

बदाम बदाम केवळ कॅल्शियमच नाही तर प्रथिने फायबर आणि निरोगी चरबीचा ही चांगला स्त्रोत आहे. रोज काही बदाम खाल्ल्याने तुमची हाडे मजबूत होतील आणि शरीराला अतिरिक्त ऊर्जा ही मिळेल. यासाठी तुम्ही भिजवलेले किंवा भाजलेले बदामाचे सेवन करू शकतात.

अंजीर कोरडे अंजीर कॅल्शियम आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. स्नॅक्स म्हणून किंवा दुधासोबत सेवन केल्याने तुम्हाला पोषण आणि ऊर्जा मिळेल.

हे सुद्धा वाचा

तीळ तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. तिळाचे लाडू, चटणी किंवा कोशिंबीर मध्ये घालून तुम्ही तिळाचा आहारात समावेश करू शकता. तीळ तुमची हाडे मजबूत करतात आणि शरीरातील ऊर्जेची कमतरता पूर्ण करतात.

संत्री संत्री मध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी दोन्ही असतात. व्हिटॅमिन सी कॅल्शियमचे शोषण करण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरातील हाडांची ताकद वाढते. दररोज संत्र्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा मिळते.

राजमा आणि कडधान्ये राजमा, हरभरे, शेंगदाणे आणि इतर कडधान्यांमध्ये कॅल्शियमसह प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे नियमितपणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि हाडेही मजबूत होतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.