सेन्सेटिव्ह त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी ‘हे’ घरगुती स्क्रब अधिक फायदेशीर!

आता हिवाळा संपला आहे आणि उन्हाळ्याची चाहुल लागत आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो.

सेन्सेटिव्ह त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी 'हे' घरगुती स्क्रब अधिक फायदेशीर!
स्क्रब
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 5:52 PM

मुंबई : आता हिवाळा संपला आहे आणि उन्हाळ्याची चाहुल लागत आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. अनेकदा वजन वाढणे, केस गळणे किंवा अन्य शारीरिक तक्रारी निर्माण होतात. उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. यामध्ये स्क्रब तुमची त्वचा स्वच्छ करते. परंतु केंव्हाही रासायनिक स्क्रबपेक्षा घरगुती स्क्रब वापरलेले चांगले असते. घरगुती स्क्रब वापरल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. होम मेड स्क्रब वापरुन आपला चेहरा निरोगी आणि चमकणारा दिसतो. चला बघूयात होम मेड स्क्रब कसे तयार करायचे….(If you have sensitive skin, try this homemade scrub)

-कॉफी आपल्या त्वचेसाठी अत्यंत चांगली असते. कॉफी त्वचेची घाण आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी कार्य करते. नारळ तेल त्वचेला नमी देण्याचे काम करते. कॉफी आणि नारळ तेलाचे स्क्रब तयार करण्यासाठी एका भांड्यात कॉफी आणि नारळ तेल मिसळा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि हलक्या हातांनी मालिश करा. काही वेळाने ते कोमट पाण्याने धुवा.

-ब्राऊन शुगर आणि ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार हे स्क्रब सर्वोत्तम असेल. या दोन गोष्टी मिसळा आणि त्याची पेस्ट बनवा. या पेस्टने चेहऱ्यावर हलके मसाज करा. त्यातील साखर त्वचेचे पोर्स साफ करेल आणि तेल चेहर्‍याची चमक परत आणेल. काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवा

-दही, ओट्स आणि मध यांची जाडसर पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट चेहर्‍यावर आणि मानेवर लावा आणि 10 मिनिटे तशीच राहु द्या. यानंतर, हलक्या हाताने किंवा बोटांनी चेहरा स्क्रब करा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

-संवेदनशील त्वचेला विशेष काळजी आवश्यक आहे. कारण, अशा त्वचेला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते, ते स्क्रबिंग टाळतात. आपल्या त्वचेवर मृत त्वचा असल्यास, ती काढून टाकण्यासाठी सौम्य स्क्रब करता येतो. सौम्य स्क्रबसाठी, पिठाच्या कोंड्यामध्ये कोरफड जेल आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावल्यानंतर हलक्या हाताने मालिश करा. थोड्या वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा.

संबंधित बातम्या : 

(If you have sensitive skin, try this homemade scrub)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.