हिवाळ्यात पाहिजे असेल चेहऱ्यावर चमक तर अशाप्रकारे करा लिंबाचा वापर
स्वयंपाक घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून त्वचेची काळजी घेता येते. त्वचेची काळजी घेण्यासाठी अत्यंत फायदेशीर उपाय म्हणजे लिंबू, ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याचे मिश्रण ही एक पारंपारिक ब्युटी ट्रीटमेंट खूप लोकप्रिय आहे आणि याचे फायदे देखील अनेक होतात.
हिवाळा आला की अनेक त्वचेच्या समस्या निर्माण होतात त्वचा काळी पडते निस्तेज दिसू लागते आणि त्याची चमक हरवून जाते. यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे जास्त गरजेचे असते. हिवाळ्यात विंटर स्पेशल स्किन केअर पाळणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या क्रीम किंवा सौंदर्य उत्पादने खरेदी करण्याची गरज नाही कारण काही घरगुती उपाय आहेत जे आपल्याला फायदेशीर ठरतील. हे उपाय आपल्याला परवडण्यासोबतच अत्यंत प्रभावी आहेत. स्वयंपाक घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून त्वचेची काळजी घेऊ शकतो. अत्यंत फायदेशीर उपाय म्हणजे लिंबू ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याचे मिश्रण ही एक पारंपारिक ब्युटी ट्रीटमेंट खूप लोकप्रिय आहे आणि याचे फायदे देखील अनेक होतात. आता काही दिवसातच हिवाळा सुरू होणार आहे त्यामुळे गुलाब जल, लिंबू आणि ग्लिसरीन लावण्याचे फायदे तोटे आणि ते लावण्याची पद्धत पाहणार आहे.
लिंबू ग्लिसरीन आणि गुलाब जल लावण्याचे फायदे
आज पासूनच नाही तर आपल्या आई आणि आजीच्या काळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाब जल, ग्लिसरीन आणि लिंबू, मिसळून सिरम तयार केला जातो त्वचेला त्याचे अनेक फायदे होतात. याचा रोज वापर केल्याने कोडेपणाच्या समस्येपासून आराम मिळतो त्यासोबतच मुरूम, लालसरपणा आणि डाग देखील कमी होतात. लिंबू,ग्लिसरीन आणि गुलाबजलच्या वापराने रंग उजळायला सुरुवात होते. त्यासोबतच त्वचेतील ओपन पोर्स सारख्या समस्या दूर करण्यासाठी ते मदत करतात आणि सुरकुत्याही दूर करण्याचं काम करतात.
होऊ शकतं हे नुकसान
लिंबू, गुलाबजल आणि ग्लिसरीन लावण्याचे अनेक फायदे असले तरी देखील चेहऱ्यावर काहीही लावण्याआधी त्याचे दुष्परिणाम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे चेहऱ्याला लावायची सुरुवात करण्याआधी पॅच टेस्ट करून घेणे गरजेचे आहे खरं तर लिंबू असल्यामुळे अनेकांच्या त्वचेला याचा त्रास होऊ शकतो जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही त्यात लिंबाचे प्रमाण कमी करा आणि पॅच टेस्ट करायला अजिबात विसरू नका. हे लावल्यानंतर पुरळ उठणे किंवा खाज येणे यासारखा काही त्रास झाल्यास ते लावणे ताबडतोब थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करा.
लिंबू, ग्लिसरीन आणि गुलाबजल कसं वापराव ?
गुलाबजल, ग्लिसरीन आणि लिंबू समप्रमाणात मिसळून लावावे असे अनेकांचे म्हणणे आहे मात्र असे करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगतो या गोष्टींची योग्य मात्रा किती असावी. हे सिरम बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे गुलाब जल एक चमचा ग्लिसरीन आणि लिंबाचे काही थेंब मिक्स करावे लागतील. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट धुतल्यानंतर हे सिरम कॉटन पॅडच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि काही दिवसातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसू लागेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)