Weight loss : चाळीशीत वजन घटवायचंय?, ‘या’ टिप्स फॉलो करा, वजन नक्की घटेल!

जवळपास प्रत्येकासाठी वाढलेले वजन ही मोठी समस्या झाली आहे. वाढत्या वयानुसार, चयापचय दर कमी होण्यास सुरवात होते आणि पोटाची चरबी वाढू लागते.

Weight loss : चाळीशीत वजन घटवायचंय?, 'या' टिप्स फॉलो करा, वजन नक्की घटेल!
वाढलेले वजन
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 9:47 AM

मुंबई : जवळपास प्रत्येकासाठी वाढलेले वजन ही मोठी समस्या झाली आहे. वाढत्या वयानुसार, चयापचय दर कमी होण्यास सुरवात होते आणि पोटाची चरबी वाढू लागते. वाढत्या वयानुसार शरीरात बरेच बदल होतात. विशेषत: स्त्रियांमध्ये अनेक हार्मोनल बदलतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की 40 व्या वर्षानंतर आपण वजन कमी करू शकत नाहीत. आपण ठरवले तर वजन कमी देखील करून शकतो. वयाच्या 40 व्या वर्षी वजन कमी करण्यासाठी कोणत्या टिप्स फाॅलो केल्या पाहिजेत. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (If you want to loss weight at the age of 40 follow these tips)

जास्त प्रथिने आहारात घ्या

वाढत्या वयानुसार स्नायूंचे प्रमाण सुमारे 3 ते 8 टक्क्यांनी कमी होते. वयाच्या 60 व्या वर्षी स्नायूंचे वजन अधिक वेगाने कमी होऊ लागते. कॅलरीज बर्न करण्यात स्नायू महत्वाची भूमिका निभावतात, ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते. आपल्या आहारात प्रथिनांचा जास्त प्रमाणात समावेश करा जेणेकरून शरीरात स्नायू तयार होऊ शकतील आणि कॅलरी सहज बर्न होऊ शकतात. अंडी, बीन्स, मांस, डाळीमध्ये प्रथिने भरपूर असतात.

कॅलरी कमी करा

वजन कमी करण्यासाठी कॅलरी कमी करणे खूप महत्वाचे आहे. प्रथिनांप्रमाणेच कार्ब देखील शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत कारण ते ऊर्जा आणि फायबरचे मुख्य स्रोत आहेत. वयाच्या 40 व्या वर्षी शरीरात बरेच बदल होतात. या दरम्यान, शरीरात पौष्टिक अन्नाच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते.

डार्क चॉकलेट खा

जर आपल्याला गोड पदार्थ आवडत असेल तर अशावेळी आपण डार्क चॉकलेट खाऊ शकतो. डार्क चॉकलेटमध्ये जस्त आणि इतर पौष्टिक घटक असतात जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. याव्यतिरिक्त, यामुळे तणाव कमी होतो. तसेच झोप चांगली लागते. यामुळे आहारात डार्क चॉकलेटचा समावेश हा केला पाहिजे.

डाएट करणे टाळा

वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा डाएट करून नका. यामुळे तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. पोषक तत्वांचा अभाव रोगांचा धोका वाढवतो. कोणताही डाएट करण्याअगोदर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपण पौष्टिक आहार घेताना फक्त कॅलरीची संख्या लक्ष घेतली पाहिजे. चरबीयुक्त पदार्थ आहारात घेणे शक्यतो टाळा.

व्यायाम करा

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचा व्यायाम हा आहे. व्यायाम केल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते. चालणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. सोपा आणि उत्तम व्यायाम म्हणजे चालणे होय. जे लोक दररोज फिरायला जातात. त्यांना जीवघेण्या आजारांचा होण्याचा धोका कमी असतो. हा व्यायाम केल्याने तुमची रक्तातील साखर नियंत्रित होते. तर दररोज 35 ते 40 मिनिटे चाला.

दररोज अंडी खा

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(If you want to loss weight at the age of 40 follow these tips)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.