पहिल्या धुलाईतच जातोय कपड्यांचा रंग ? पाण्यात टाका फक्त 2 गोष्टी आणि पहा कमाल….
Cotton Clothes Fading Colours : बऱ्याच वेळेस कॉटनच्या कपड्यांचा पहिल्या धुलाईतच रंग जातो व ते फिके होतात. तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल तर काही उपायांची मदत घेऊ शकता. या टिप्सनी कपड्यांचा रंग जाणार नाही.
How To Wash Cotton Clothes Without Fading : बऱ्याच वेळेस ऊन आणि घामामुळे आपल्याला त्रास होतो. अशा वेळी सुती किंवा कॉटनचे तपडे घालणे फायदेशीर होते. यामुळे बॉडी टेंपरेचर नॉर्मल राहण्यासही मदत होते आणि घामही शोषला जातो. पण ह्युमिडिटी जास्त झाल्यावर कॉटनचे कपडे (cotton clothes) घालूनही आराम मिळत नाही. अशावेळी कॉटन कपडे धुवायला काढले आणि पहिल्या धुलाईतच त्याचा रंग (fading colors) गेला तर पैसे वाया गेल्याचं आणखीनट वाईट वाटतं. तुमच्या कपड्यांचा रंगही पहिल्या धुलाईत जाऊन रंग फिका पडत असेल तर काही उपायांनी हे थांबवता येतं.
काही ट्रिक्सचा वापर केल्यास कपड्यांचा रंगही जात नाही आणि तुम्ही वर्षानुवर्ष ते कपडे वापरू शकता, जे नव्या सारखेच दिसतील.
कपड्यांचा रंग का जातो ?
कपडे तयार करणाऱ्या कंपन्या बऱ्याच वेळेस जास्त नफा कमावण्याच्या नादात कच्च्या रंगाचा वापर करतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस पहिल्या धुलाईतच कपड्यांचा रंग जातो आणि ते फिके पडतात. पण काही वेळा महागड्या आणि ब्रँडेड कपड्यांबाबतीतही हा प्रॉब्लेम येतो. अशा वेळेस कपडे धुतानाच काही काळजी घेतली आणि टिप्स फॉलो केल्या तर रंग जाणार नाही आणि कपडेही नेहमी नव्या सारखेच दिसतील.
रंग जाऊ नये म्हणून काय करावा उपाय ?
तुमच्या कपड्यांचा रंग जाऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी काही टिप्स फॉलो करा. एका बालदीत किंवा टबमध्ये गार, थंड पाणी घ्यावे. त्यामध्ये ७-८ चमचे मीठ आणि ४-५ चमचे बारीक केलेली तुरटी किंवा तुरटीची पावडर घालावी. हे सर्व पाण्यात नीट मिक्स होऊ द्यावे. नंतर या मिश्रणाच्या पाण्यातच तुमचे सुती कपडे भिजवावे आणि तासभर तसेच राहू द्यावेत. नंतर साध्या पाण्याने कपडे स्वच्छ धुवून टाकावेत. त्याचा परिणाम कसा होतो ते तुम्ही नक्कीच पाहू शकाल.
पण मीठ आणि तुरटीमुळे तुमचे कपडे कडक होऊ शकतात. हे टाळायचे असेल तर बादलीभर पाण्यात व्हिनेगर टाकावे आणि धुतलेले कपडे त्यात भिजवून नंतर वाळत घालावेत. यामुळे तुमचे कपडे अतिशय मऊ आणि सॉफ्ट राहतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)