कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय? मग आहारात समाविष्ट करा ‘या’ भाज्या

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रोगप्रतिकारक शक्ती वाढणे महत्वाचे झाले आहे.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय? मग आहारात समाविष्ट करा 'या' भाज्या
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 8:56 AM

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रोगप्रतिकारक शक्ती वाढणे महत्वाचे झाले आहे. त्यासाठी आहारात काही बदल करणे महत्वाचे आहे. कोरोनाच्या काळात आपण हेल्दी खाल्ले पाहिजे. पपई, भोपळा, सोयाबीन आणि हिरव्या भाज्यांचा सूप या काळात घेतला पाहिजे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ते सुपरफूड्सपैकी एक आहे. विशेष म्हणजे पपई, भोपळा, सोयाबीन आणि हिरव्या भाज्यांचा सूप आपण दिवसातून कधीही घेऊ शकतो. (In the diet to boost the immune system Take papaya, pumpkin, beans and greens)

आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे हे खूप महत्वाचे आहे. जर रोग प्रतिकारशक्ती चांगली असेल तर केवळ कोरोनाच नव्हे तर कोणताही रोग आपल्याला स्पर्श करू शकत नाही. पपई आपल्या शरीरात व्हिटॅमिन-सीची कमतरता पूर्ण करते. शरीरात पुरेसे व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होत नाही. यासाठी दिवसामधून जसा वेळ मिळेल तसा पपईचा सूप किंवा रस घेऊ शकता.

दुधी भोपळा हा शरीरासाठी खाणे चांगला असतो. दुधी भोपळ्याला आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर आहे. आठवड्यातून तीन वेळा दुधी भोपळ्याचा रस पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. दुधी भोपळ्याचा रस तुमचे वजन कमी करण्यासही मदत करते. लोह, जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम समृद्ध आहे. रोज दुधी भोपळ्याचा रस घेतल्याने वजन कमी होते.

सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, मॉलिव्डेनम, ट्रिप्टोफॅन, मँगनीज, लोह, ओमेगा-३, फॅटी अॅसिड्स, फॉस्फरस, फायबर, मॅग्नेशियम, तांबे, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्व आणि काही प्रमाणात पोटॅशियम असते. सोयाबीनमध्ये स्निग्ध पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. यामुळे आहारात आठवड्यातून दोन वेळातरी सोयाबीनचे सेवन केले पाहिजे. यातील आयसो फ्लेव्हन संयुगांमुळे शरीरातील चरबीच्या पेशींचे उत्पादन कमी होते म्हणजेच वजन कमी राहण्याच्या दृष्टीनं सोयाबीने उत्तम आहे.

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात. शक्यतो आहारात हिरव्या भाज्यांचे रस घ्यावा. याचा फायदा आपल्या शरीराला होतो.

संबंधित बातम्या : 

(In the diet to boost the immune system Take papaya, pumpkin, beans and greens)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.