ख्रिसमस पार्टीच्या मेन्यूमध्ये या पदार्थांचा करा समावेश, तुमचं कौतुक करताना पाहुणे थकणारच नाहीत
ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जर तुम्ही तुमच्या घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन करत असाल तर सजावटी सोबतच जेवणाची ही काळजी घेणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या स्वादिष्ट गोष्टी असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी पार्टीमध्ये ठेवल्याने तुमचे येणारे पाहुणे खुश होतील.
ख्रिश्चन धर्मीय लोकांसाठी ख्रिसमसचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो. ख्रिसमस हा सण ते मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी अनेक जण कुटुंबासह बाहेर फिरायला जातात तर काहीजण घरीच पार्टीचे आयोजन करतात. या खास दिवशी जर तुम्हीही तुमच्याच घरी पार्टीचा आयोजन केले असेल तर तुम्हाला डेकोरेशन सह अन्य काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. ख्रिसमस असो किंवा इतर कोणतीही पार्टी सजावटी पासून ते खाद्यपदार्थांपर्यंत योग्य व्यवस्था असणं अत्यंत आवश्यक आहे. योग्य आणि चविष्ट जेवणाने पार्टी आणखीन छान होते. पाहुण्यांना चवदार आणि वैविध्यपूर्ण अन्न मिळाल्यास त्यांना आनंद होतो आणि समाधान वाटते. पार्टीला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आवड निवड वेगळी असते काही लोक शाकाहारी असतात तर काही जण मांसाहारी असतात. म्हणून पार्टीचा मेनू ठरवण्यापूर्वी पार्टीला येणाऱ्या पाहुण्यांना कोणते पदार्थ आवडतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. तुम्ही दिलेली पार्टी ही तुमच्या पाहुण्यांना कायम लक्षात रहावी आणि त्यांना आवडण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. जाणून घेऊया तुमच्या पार्टीचा कोणता मेन्यू तुमच्या पाहुण्यांना खुश करू शकेल.
स्टार्टर
पार्टीची सुरुवात हलकी आणि स्वादिष्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या पाहुण्यांना स्टार्टर देऊ शकता. जेवणापूर्वी हे पदार्थ दिले जातात. ज्यामध्ये पिझ्झा आणि बर्गर यासह अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असतो. तुम्हालाही काही वेगळे करायचे असेल तर तुम्ही स्टार्टरमध्ये bruschetta ट्राय करू शकता. हा एक इटालियन पदार्थ आहे ज्यामध्ये टोमॅटो, तुळस आणि ऑलिव्ह ऑइल सह टोस्ट केलेल्या ब्रेडच्या तुकड्यांवर दिला जातो. त्याची रेसिपी तुम्ही ऑनलाईन सहज शोधू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही स्टार्टर मध्ये अनेक गोष्टी समाविष्ट करू शकतात. तुमच्या पाहुण्यांच्या आवडीनुसार तुम्ही पनीर टिक्का, थाई फिश केक, चीझी कारमेल कॉर्न, स्प्रिंग रोल्स, आणि चीज कोर कोटा स्टार्टर्समध्ये बनवू शकता.
ड्रिंक्स
पार्टीमध्ये ड्रिंक्स असणे आवश्यकच आहे. तुम्ही अल्कोहोल नसलेले ड्रिंक्स पाहुण्यांना देऊ शकता. हिवाळ्यामध्ये हॉट चॉकलेट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्ही पार्टीत पाहुण्यांना कोल्ड्रिंक, ज्यूस किंवा शेक आणि कॉफी यासारखे ड्रिंक्स देऊ शकतात.
गोड पदार्थ
कोणतीही पार्टी किंवा कार्यक्रम हा मिठाई शिवाय अपूर्णच असतो. मेन्यूमध्ये निश्चितपणे काही गोड पदार्थांचे समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण या मेनू मध्ये चॉकलेट किंवा फ्रुट केक चा समावेश करू शकतो. तुम्ही पाहुण्यांना प्लम पुडिंग देखील देऊ शकता. हा एक प्रकारचा गोड पदार्थ आहे जो ख्रिसमस मध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. यासोबतच गाजरचा हलवा, फ्रुट्स आणि चॉकलेट्स हे देखील पार्टीमध्ये डेझर्ट म्हणून एक चांगला पर्याय ठरू शकतील.
जेवण
पार्टीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे म्हणजे जेवण. जर तुमच्या पाहुण्यांना जेवण आवडले तर तुमची पार्टी छान झाली असे मानले जाते. तुमच्या पाहुण्यांना मांसाहार आवडत असेल तर तुम्ही भाजलेले चिकन, लॅम्ब चॉप्स, मटन करी, चिकन मसाला किंवा तुमच्या आवडीची कोणतीही मांसाहारी डिश तयार करू शकता. तर व्हेज पदार्थांमध्ये तुम्ही पनीर पासून बनवलेले काही पदार्थ, भाज्यांचे स्टिर-फ्राई, आचारी पनीर टिक्का, पास्ता, दम आलू, वरण-भात, नान आणि रोटी सर्व्ह करू शकता.