बदलत्या हवामानापासून सुरक्षित राहायचेय? मग, आहारात सामील करा ‘या’ गोष्टी

सध्या हवामानामध्ये बदल झालेले दिसत आहेत. सकाळी आणि संध्याकाळच्या थंडी आणि दिवसभर उन्हाचा चटका जाणवत आहे

बदलत्या हवामानापासून सुरक्षित राहायचेय? मग, आहारात सामील करा 'या' गोष्टी
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 1:01 PM

मुंबई : सध्या हवामानामध्ये बदल झालेले दिसत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी थंडी आणि दिवसभर उन्हाचा चटका जाणवत आहे. या अशा हवामानामुळे ताप, खोकला आणि सर्दी आणि फ्लूचा धोका वाढतो. यामुळे या हवामानामध्ये आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या बदलेल्या वातावरणामुळे आपण देखील पुन्हा पुन्हा आजारी पडत आहात का? तर आपल्याला विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. सर्दी, ताप यासारख्या आजारांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. (include these foods in your summer diet for healthy body)

-अशा हवामानामध्ये शक्यतो मोड फुटलेले कडधान्य खाणे खूप चांगले आहे. हा असा खजिना आहे भरपूर मोड आलेले धान्य जसे मूग, मटकी, हरभरा आणि भिजलेल्या डाळी खा. त्यातील पोषकद्रव्ये तुमच्या आरोग्यासाठी चांगली असतात. मोड फुटलेले कडधान्य दररोज खाल्ली तर त्याचे चांगले परिणाम आपल्या आरोग्यावर होतील.

-आजारी पडू नये म्हणून आपल्याला रोगप्रतिकारक चांगली करणे आवश्यक आहे. त्यासाठी संत्री आणि हंगामानुसार येणारे फळे खाल्ली पाहिजेत. व्हिटॅमिन सी मुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे आहारामध्ये शक्यतो व्हिटॅमिन सी जास्त घ्यावे.

-दररोजच्या जेवणामध्ये ज्वारी, बाजरी, मका यांचाही समावेश करा. शक्यतो आपण गहू जास्त प्रमाणात खातो मात्र, ज्वारी, बाजरी, मका यामधूनही आपल्या शरीराला चांगले पौष्टिकतत्व मिळतात.

-या सर्वांसोबतच महत्वाचे आहे ते म्हणजे आपण दररोज व्यायाम केला पाहिजे. दिवसातून थोडा तरी वेळ हा व्यायामासाठी दिला पाहिजे.

-आहारामध्ये हळद, तुळस आणि आद्रक यांचाही वापर वाढवा हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

High Blood Pressure | केवळ मीठच नव्हे, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी!

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(include these foods in your summer diet for healthy body)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.